मुंबई : मुंबई-गोवा क्रूझ पार्टीत ड्रग्ज सापडल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. आर्यन खानला 3 ऑक्टोबरला NCB ने अटक केली होती. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने 2 ऑक्टोबरला क्रूझवर धाड टाकून 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप आहे. आर्यन खानसह 8 जणांना 7 तारखेपर्यंत NCB कोठडी होती, काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज आर्यन खानच्या जामीनाबाबत कोर्टात पुन्हा सुनावणी झाली.
आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही, एक ग्रॅम देखील नाही म्हणून जामीन मिळावा, असं सतीश मानेशिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
दरम्यान सुनावणीवेळी NCB कडून अॅडव्होकेट अनिल सिंग यांनी बाजू मांडली तर आर्यन खानची बाजू सतीश मानेशिंदे यांनी युक्तीवाद केला. यावेळी दोन्ही वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. सतीश मानेशिंदे हे आर्यनच्या जामीनासाठी आग्रही होते तर अनिल सिंग NCB ची बाजू कशी योग्य आहे हे सांगत होते. मात्र दोन्ही वकिलांना भांडताना पाहून न्यायाधीशांनी हस्तक्षेप केला. “जर तुम्ही माझ्यासमोर असे वाद घालत असाल, तर मी काहीही बोलू शकणार नाही, जर मला अर्ज मिळाला तर मी निर्णय घेऊ शकेन” असं कोर्ट म्हणालं.
सतीश मानेशिंदे : आपण 15 मिनिट वाया घालवले आहेत बोलायला द्यावे
अनिल सिंग : सर्वात आधी जामीन अर्ज कायम ठेवण्याबाबत उत्तर द्या
मानेशिंदे : तुम्ही कोर्टाला आदेश देऊ शकत नाही
अनिल सिंग : जामीन अर्ज कायम ठेवण्याबाबत सहसा पहिल्यादा बोललं जातं मग दुसरा पक्ष उत्तर देतो
मानेशिंदे : जामीन अर्जाबाबत बोला, जमिनाबाबत एनसीबीने आत्तापर्यंत एकही प्रश्न उपस्थित केला नाही
मानेशिंदे : एवढ्या वर्षात मी हे पाहिलं नाही, मला आश्चर्य वाटतं आहे, या केसमध्ये काहीही सापडलं नाही, कोर्टने रिमांड फेटाळली आहे.. न्यायालयीन कोठडी आहे आणि हे असे मुद्दे उपस्थित करत आहेत
कोर्ट : जर तुम्ही माझ्यासमोर असे वाद घालत असाल तर मी काहीही बोलू शकणार नाही, जर मला अर्ज मिळाला तर मी निर्णय घेऊ शकेल
कोर्ट : तुमच्या उत्तरात तुम्ही जामीन अर्जावरील आक्षेपाचा मुद्दा मांडू शकता, दुसऱ्या अर्जाची गरज नाही
अनिल सिंग : निकालपत्रावर अवलंबून आहे
मानेशिंदे : मला प्रथम उत्तर बघायचं आहे
मानेशिंदे : एनसीबी कडून दाखल केलेल्या उत्तरावर बोलण्याबाबत विचारणा केली, तिघा आरोपांबाबत वेगवेगळी उत्तरं एनसीबीने दाखल केली आहेत.
सतीश माने शिंदे यांच्याकडून रिया चक्रवर्ती यांच्या केसचा दाखला
मानेशिंदे : या केसमध्ये काहीही जप्त केलेले नसताना एवढं महत्व का दिलं जात आहे
अनिल सिंग: तुम्ही असे म्हणू शकत नाही
सतीश माने शिंदे आणि एएसजी अनिल यांच्यात शाब्दिक वाद
मानेशिंदे : रिया चक्रवर्ती हिच्या जमिनीचा दाखला देत आहेत.
अनिल सिंग : एनसीबीचं उत्तर वाचून दाखवत आहेत.
मानेशिंदे : या केसमध्ये काहीही जप्त केलेले नसताना एवढं महत्व का दिलं जात आहे
अनिल सिंग: तुम्ही असे म्हणू शकत नाही
अनिल सिंग : सध्या 17 आरोपी कस्टडीमध्ये आहेत, जर एखादा सुटला तर केसवर परिणाम होईल
संबंधित बातम्या
Aryan Khan Drug Case LIVE : आर्यन खानला जामीन मिळणार का? सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद सुरु