मुंबई : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली मुंबईत उन्मादाचं दर्शन पाहायला मिळालं. एका टेबलवर ठेवलेले 33 केक कापून हुल्लडबाजांच्या टोळक्याने नासधूस केली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
नेमकं काय घडलं?
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तरुणांचं टोळकं मास्कशिवाय एकत्र जमलं होतं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा तर वाजलेच. पण त्यानंतर हुल्लडबाजांच्या उन्मादाचं दर्शन घडलं. 15 ते 20 युवक या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. एका टेबलवर ठेवलेले 33 केक आधी बर्थडे बॉयने कापले. त्यानंतर जमलेले तरुण अक्षरशः त्यावर तुटून पडले. कोणी केक एकमेकांना फेकून मारले, तर कोणी एकमेकांच्या चेहऱ्यावर फासले. त्यामुळे अन्नाची नासाडी झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्ग परिसरातील असल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उमटली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरु केली आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन
VIDEO | बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या