मुंबई: क्रूझवरील रेव्ह पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनसह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये उद्योजकांच्या तीन मुलींचाही समावेश आहे. तसेच ताब्यात घेतलेल्यांची नावंही उघड झाली असून त्यापैकी दोघांची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हे क्रूझ मुंबईवरून गोव्याला जात होते. शनिवारी दुपारी क्रूझ निघाले होते. 4 ऑक्टोबर रोजी ते मुंबईत येणार होते. तीन दिवस ही पार्टी चालणार होती. या पार्टीसाठी दिल्लीहून तीन मुली आल्या होत्या. या तिघींची कसून चौकशी सुरू आहे. या तिघीही उद्योगपतींच्या मुली आहेत. एनसीबीने या मुलींचेही फोन जप्त केले आहेत. फोनमधील चॅटची कसून तपासणी केली जात आहे. तसेच एनसीबीच्या दिल्ली हेडक्वॉर्टरमधून या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणात न्यायसंगत आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली जाईल. ड्रग्जप्रकरणात ज्यांचा सहभाग असेल त्यांच्याविरोधात कारवाई होणारच, असं एनसीबीने स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आर्यन खान
अरबाज मर्चंट
मुनमुन धनीचा
नुपुर सारिका
इश्मीत सिंह
विक्रांत चोकर
गोमित चोपड़ा
मोहक जसवाल
या प्रकरणी एनसीबीने सहा आयोजकांना समन्स जारी केलं आहे. तसेच फॅशन टीव्ही इंडियाचे एमडी काशिफ खान यांनाही पाचारण केलं आहे. तसेच कॉर्डेलिया क्रूझचे अध्यक्ष आणि सीईओ जुर्गन बेलोम यांनी सांगितले की, छापेमारीवेळी एनसीबीने काही प्रवाशांच्या सामानातून ड्रग्स जप्त केलं असून त्यांना जहाजातून उतरवलं आहे. त्यामुळे उशिर होत असून त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे.
आर्यन याची कसून चौकशी केली असता मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावलं होतं. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसे भरले नव्हते. ऑर्गनायजरने माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं, असा दावा आर्यनने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच आर्यनचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचे व्हॉट्सअॅप चॅटही तपासले जात आहेत. रेव्ह पार्टीबाबत या चॅटमध्ये काही चर्चा झाली होती का? या रेव्ह पार्टी पूर्वीपासूनच सुरू आहेत का? आदी माहिती एनसीबी घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी 60 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती.
या क्रुझवरून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर प्रचंड ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त कर्मयात आलं आहे.
संबंधित बातम्या:
शाहरुखच्या मुलाचा फोन जप्त, चॅटमध्ये नेमकं काय?; कारवाईत अटक करण्यात आलेल्या त्या दोन महिला कोण?
मोठी बातमी : शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई