मुंबई : अँटीजन चाचणी करुन परतत असताना बलात्काराचा आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील कांदिवली भागात हा प्रकार घडला असून चारकोप पोलिसांनी आरोपी अविनाश यादव (Avinash Yadav) चा शोध सुरु केला आहे. गाडी सिग्नलवर थांबल्याची संधी घेत पोलिसांना धक्का देत आरोपीने हातकडीसह पलायन केले. (Mumbai Kandivali Rape Accuse Avinash Yadav fled away while returning from antigen test)
काय आहे प्रकरण?
21 वर्षीय अविनाश यादव असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळलेल्या माहितीनुसार, यादवला 26 जून 2021 रोजी मुंबईतील चारकोप पोलिसांनी अटक केली होती. त्याचे एका 17 वर्षीय मुलीवर प्रेम होते. मात्र तिच्या घरच्यांना ही बाब मंजूर नव्हती. दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर पीडितेच्या पालकांच्या तक्रारीनुसार अविनाश यादववर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना धक्का देत आरोपीचा पोबारा
पोलिसांनी यादवला चार दिवसांपूर्वी अटक केली होती. गुरुवारी सकाळी त्याला अँटीजन चाचणी करण्यासाठी नेण्यात आले होते. तिथून परतत असताना कांदिवली सिग्नलला गाडी थांबली होती. त्याचा फायदा घेत पोलिसांना धक्का देत हातात तो पळाला. हातात असलेल्या पोलिसांच्या बेड्यांसोबत यादव पळाला. त्यानंतर लगेचच याबाबत चारकोप पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात याबाबत मेसेज पाठवला आणि त्याचा शोध सुरु केला आहे.
आरोपीचे वर्णन :
अविनाश हरिश्चंद्र यादव, वय 21 वर्षे, राठी लक्ष्मीनगर, चारकोप, मुंबई
काळा टी शर्ट, रंग निमगोरा, उंची 5 फूट 4 इंच,
कुरळे केस मागे वळलेले, गालावर उजव्या बाजूस तीळ असलेला,
उजव्या हातात बेडी
संबंधित बातम्या :
अनलॉक मोबाईल, त्यात गुगल पे, चोरट्याने पाच मिनिटात बँक खातं रिकामं केलं
दहिसरमध्ये सोन्याच्या दुकानात लूट, मालकाची गोळी झाडून हत्या, नांगरे पाटील घटनास्थळी
VIDEO | लॉक तोडून महागड्या स्पोर्ट्स सायकलची चोरी, मुंबईत एकाला अटक, दोघे पसार
(Mumbai Kandivali Rape Accuse Avinash Yadav fled away while returning from antigen test)