मुंबई : मुंबईतील दहिसर-बोरिवली भागात वकिलावर तलवार हल्ला केल्याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सत्यदेव जोशी यांना भररस्त्यात मारहाण करुन तलवारीने वार करण्यात आले होते. या प्रकरणी आधी तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे. तलवार हल्ल्याची घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
18 जुलै रोजी बोरिवली पश्चिमेला कांदरपाडा भागात ही घटना घडली होती. तलवार हल्ल्यात वकील सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. वकिलावर झालेल्या तलवार हल्ल्याची दृश्यं मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाली आहेत.
Three persons have been arrested for attacking a lawyer with a sword in Mumbai’s Borivali area. FIR has been registered. Probe on: Mumbai Police#Maharashtra pic.twitter.com/MjkrsQ6GLH
— ANI (@ANI) July 19, 2021
हल्ल्याची दृश्यं :
मुंबईत भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद pic.twitter.com/HAIcdlKaRw
— Anish Bendre (@BendreAnish) July 19, 2021
उस्मानाबादेत डॉक्टरचा वकिलावर हल्ला
दुसरीकडे, न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामधील वकीलपत्र सोडून दे, अन्यथा जीव घेऊ, अशी धमकी देत उस्मानाबादमध्ये वकिलावर डॉक्टरने जीवघेणा हल्ला केला होता. वकील प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी डॉ अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहिते हे डॉ. मोरेंचे मेहुणे असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO | मुंबईत भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद
डॉक्टर दाम्पत्याच्या घटस्फोटाचा खटला, वकील मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला, डॉक्टर पतीसह तिघे पसार
(Mumbai Lawyer attacked by sword at Borivali Dahisar 9 arrested)