बनावट नोटा चलनात आणण्याचा उद्योग, टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी…

| Updated on: Jan 12, 2025 | 9:51 PM

Mumbai Crime: भायखळा पूर्व येथे तीन इसम हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार केली. काही वेळानंतर तीन संशयीत आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची तपासणी पोलिसांनी केली. त्यांच्या जवळ भारतीय चलनाच्या ५०० रूपये किमतीच्या २०० बनावट नोटा सापडल्या.

बनावट नोटा चलनात आणण्याचा उद्योग, टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी...
क्राईम न्यूज
Image Credit source: social media
Follow us on

Mumbai Crime: बनावट नोटा करुन चलनात आणण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात. कमी कालावधीत जास्त कमाई करण्याच्या मोहात गुन्हेगारांकडून बनावट नोटा तयार केल्या जातात. मुंबईतील भायखळा पोलिसांनी हा प्रकार उघड केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळी बनावट छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

भारतीय चलनाच्या ५०० रूपये दराच्या बनावट नोटा बनवणारी टोळी मुंबईत कार्यरत होती. या नोटा चलनामध्ये वितरीत करणाचे काम ही टोळी करत होती. भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरु होता. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. भायखळा पूर्व येथे तीन इसम हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार केली. काही वेळानंतर तीन संशयीत आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची तपासणी पोलिसांनी केली. त्यांच्या जवळ भारतीय चलनाच्या ५०० रूपये किमतीच्या २०० बनावट नोटा सापडल्या.

असा उघड झाला कारखाना

ताब्यात घेतलेल्या तीन इसमांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे बनावट नोटा बनवत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी वाडा येथे जाऊन आरोपी निरज वेखंडे आणि खलील अन्सारी हे बनावट नोटा तयार करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ५०० रूपयांच्या बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घटनास्थळी मिळून आले. त्यात लॅपटॉप, प्रिंटिंग मशीन, लॅमीलेशन मशीन, तसेच A4 साईजचे १३६७ नग बटर पेपर जप्त केले.

हे सुद्धा वाचा

या आरोपींना अटक

बनावट नोटा छापण्याचे उद्योग करणारे उमरान उर्फ आसिफ उमर बलबले, यासिन युनूस शेख, भीम प्रसादसिंग बडेला आणि निरज वेखंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उद्या आरोपींना न्यायालयात हजर करणार आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे.