Mumbai Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पनवेलमधील 60 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाला आहे. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यावर त्या व्यक्तीसोबत एका जण स्कुटीवरुन जाताना दिसला. मात्र, परत आल्यावर ते एकटेच गाडीवर होते. पोलिसांनी स्कुटीवरील त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला.
पनवेलमधील वावंजे येथे राहणाऱ्या 60 वर्षीय याकूब खान अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि यांत्रिक मदतीने याकूब खानचा शोध सुरू केला. ज्या दिवशी याकूब खान बेपत्ता झाले त्या दिवशी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. घटनेच्या दिवशी त्याच्या सोबत एक अनोळखी व्यक्ती त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. याकूब खान त्या व्यक्तीसोबत बोलताना दिसून आले. त्यानंतर ती व्यक्ती याकूब खान यांच्या स्कुटीवरून जाताना दिसली. मात्र परत येताना मागे बसलेली अनोळखी व्यक्ती एकटा आला.
पोलिसांनी स्कुटीवरील त्या व्यक्तीचा शोध सुरु केला. तो श्रीकांत तिवारी होता. त्याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलीस खाक्या दाखवला. त्यानंतर काय घडले, ते त्या व्यक्तीने सांगितले. आपली पत्नी आणि वडिलांना याकूब खान याने वारंवार अपशब्द वापरले. त्यामुळे त्या व्यक्तीला मारून टाकल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
सहाय्यक आयुक्त विजयकुमार लांडगे यांनी सांगितले की, याकूब खान यांचा भंगारचा व्यवसाय होता. 29 ऑक्टोंबर रोजी याकूब खान यांची स्कूटी मिळाली. त्यानंतर क्राईम बँचची पथके तयार केली. त्यांनी तपास सुरु केला. हा व्यक्ती श्रीकांत तिवारी होता. त्याचा घरी जाऊन चौकशी केली असता तो मिळाला नाही. त्याचा मोबाईल बंद होता. मग अजून तपास केला असता तो उत्तर प्रदेशात आढळला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.