प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन अचानक चर्चेत आली आहे. एका घटनेमुळे तिची अचानक चर्चा सुरू झाली आहे. एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात रवीना टंडन काही लोकांमध्ये घेरलेली दिसत आहे. मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने रवीनावर गंभीर आरोप केला आहे. रवीना दारुच्या नशेत होती. दारुच्या नशेतच रवीनाने माझ्या आईला मारहाण केली, असा आरोप या व्यक्तीने केला आहे. तसेच रवीनाच्या ड्रायव्हरने त्याची गाडी माझ्या आईच्या अंगावर चढवली, असा गंभीर आरोपही त्याने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रवीनाच्या या कृत्यावर लोकांचा संताप येत असतानाच पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
रवीनावर तीन महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मिड-डेशी संवाद साधताना एका पोलीस अधिकाऱ्याने हा आरोप फेटाळून लावला आहे. या घटनेत कुणालाही मारहाण झाली नाही. कुणालाही जखम झालेली नाही. तसेच रवीना नशेत नव्हती, असं या पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे. तर, मोहम्मद नावाच्या व्यक्तीने आणखी एक आरोप केला होता. रवीनाने मारहाण केल्याने माझ्या आईचं डोकं फुटलं असल्याचं त्याने म्हटलं आहे. मात्र, पोलिसांनी हा आरोपही फेटाळून लावला आहे. असं काही झालंच नाही. रवीना किंवा तिच्या वाहनचालकाने कुणालाही मारहाण केली नाही. कोणतीही मारहाण केली नाही, असं या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. रवीनाचा ड्रायव्हर गाडी बॅक करत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. मागे मोहम्मदचं कुटुंब रस्ता पार करत होतं. तेव्हा या लोकांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि गाडी बॅक करताना मागे पाहिलं पाहिजे असं सांगितलं. यात काही बुजुर्ग महिला होत्या. त्यानंतर ड्रायव्हर आणि मोहम्मदच्या कुटुंबीयांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या.
शाब्दिक चकमक सुरू असताना शिवीगाळही झाली. त्यानंतर काय झालं म्हणून रवीना तिथे पाहायला गेली होती. एव्हाना या ठिकाणी गर्दी झाली होती. त्यावेळी ड्रायव्हरने गर्दीतून रवीनाला वाचवण्याचा प्रयत्न केला. रवीनाला पाहून लोकांनी अधिकच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रवीनाने खार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती.