ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचं प्रमोशन, फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना बेड्या

| Updated on: Oct 19, 2022 | 6:45 PM

राज मौर्य आणि त्याचे साथीदार अक्षत सलुजा आणि संजय यांनी मानसिंगशी संपर्क साधला.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचं प्रमोशन, फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना बेड्या
फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना बेड्या
Follow us on

मुंबई : OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या प्रमोशनच्या नावाखाली 45 लाखांची फसवणूक (Cheats) करण्यात आली. याप्रकरणी ओशिवरा परिसरातून तीन आरोपींना मुंबई ( Mumbai) पोलिसांच्या उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमध्ये चित्रपट (Movies) लेखक आणि चित्रपट दिग्दर्शकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट हॉटस्टार लेटरहेड आणि इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. सायबर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. दोघांना पोलीस कोठडी मिळाली तर एका आरोपीला कारागृहाची रवानगी झाली.

पोलिसांनी सांगितले की, मानसिंग नावाच्या चित्रपट दिग्दर्शकाने उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांना तक्रार दिली होती. त्यानुसार, त्याच्या हिंदी चित्रपट छपा एमडीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रमोशनसाठी परवानगी देण्यात आली होती.

हे पाहून आरोपी राज मौर्य आणि त्याचे साथीदार अक्षत सलुजा आणि संजय यांनी मानसिंगशी संपर्क साधला. राज मानसिंगला सांगतो की तो त्याच्या “छपा एमडी” चित्रपटाच्या रिलीजसाठी प्रमोशन करेल.

मानसिंगने त्याला 45 लाख रुपये दिले. त्या बदल्यात आरोपी राज मौर्याने मानसिंगला हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्म नावाच्या डुप्लिकेट लेटरहेडवर चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आणि तो ओटीटीवर चालवण्यासाठी दिले होते.

काही दिवसांनंतरही, जेव्हा राज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी OTT वर चित्रपटाचे प्रमोशन केले नाही. तेव्हा मानसिंगला संशय येऊ लागला. राजने दिलेले हॉटस्टारचे लेटरहेड मानसिंगने तपासले असता ते बोगस असल्याचे समोर आले.

मानसिंगने याबाबतची तक्रार कांदिवली पूर्व समता नगर येथील सायबर सेलकडे केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींना ओशिवरा परिसरातून अटक करण्यात आली. अशी माहिती उत्तर सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी दिली.