पॅसेंजरमध्ये गोळीबार करणाऱ्या चेतन याला अचानक भास व्हायचे आणि मग… चेतन सिंह याच्या आजारावर मोठी अपडेट

| Updated on: Aug 02, 2023 | 8:48 AM

चेतनचं घर मथुराच्या टॅकमॅ सिटी कॉलोनीत आहे. त्याची पत्नी आजारी आहे. तिला रुग्णालयात अॅडमिट करणअयात आलं आहे, असं सांगण्यात येतं.

पॅसेंजरमध्ये गोळीबार करणाऱ्या चेतन याला अचानक भास व्हायचे आणि मग... चेतन सिंह याच्या आजारावर मोठी अपडेट
rpf constable chetan singh
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : आरपीएफचा जवान चेतन सिंह याने जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार करून आरपीएफ जवानासह चार जणांना ठार केलं. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला कोर्टात दाखल करण्यात आले असता 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून त्याच्याबाबतची नवनवीन माहिती समोर येत आहे. त्याच्या शेजाऱ्यांच्या मते तो अत्यंत शांत होता. कुणाशीही बोलत नव्हता. त्याच्या पत्नीशीही त्याचे कधी भांडण झाले नव्हते. मात्र, डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला मानसिक आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चेतन सिंह याला अचानक भास होण्याचा आजार होता. त्याच्यावर उत्तर प्रदेशातील मथुरात उपचार सुरू होते. भास झाल्यावर त्याला राग यायचा. यावेळी तो काहीबाही बरळायचा, असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. चेतन सिंहला भास होण्याचा आजार होता. त्यामुळे त्याने या आजाराच्या झटक्यातून तर हा गोळीबार केला नाही ना? असा सवालही केला जात आहे. व्हिडीओत तो ज्या पद्धतीने बोलताना दिसत आहे, त्यावरून त्याला भास होण्याचा झटका आला होता का? असा सवालही केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

मी काहीच केलं नाही

मी काहीही केलं नाही. मी निर्दोष आहे, असं आरोपी चेतन सिंह याने त्याचे वकील सुरेंद्र लांडगे यांना सांगितल्याचं कळतं. पोलिसांनी तपासासाठी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करणार आहेत. मात्र आरोपी म्हणतोय त्याने काहीही केलं नाही, त्यामुळे तपास अधिकाऱ्यांसमोर त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचं आव्हान असणार आहे.

वडिलांच्या जागेवर नोकरीला लागला

चेतनला 12 वर्षापूर्वी नोकरी मिळाली होती. वडिलांच्या जाग्यावर त्याला नोकरी मिळाली होती. पण वरिष्ठ अधिकारी त्याचा छळ करत होते. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. आधी त्याची उज्जैन, नंतर बडोदा आणि आता मुंबईत बदली करण्यात आली होती, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

सिटी कॉलनीत राहायचा

चेतनचं घर मथुराच्या टॅकमॅ सिटी कॉलोनीत आहे. त्याची पत्नी आजारी आहे. तिला रुग्णालयात अॅडमिट करणअयात आलं आहे, असं सांगण्यात येतं. मात्र, आरपीएफची टीम त्याच्या पत्नीला मुंबईला घेऊन आल्याची माहिती आहे. चेतनला तीन वर्षाची एक मुलगी आहे. दोन वर्षापूर्वी तो मथुरात आला होता. येथील गंगाधाम कॉलोनीत त्याने फ्लॅट बांधला होता.

चेतनचा स्वभाव चांगला

शेजाऱ्यांच्या मते चेतनचा स्वभाव चांगला होता. त्याचं कुणाशी भांडण नव्हतं. वाद नव्हता. त्याला एरियात एक दोन वेळाच पाहिलं. तो कामानिमित्ताने सतत बाहेर असायचा. त्याच्या पत्नीशी नेहमी भेट व्हायची. तिच्याशी बोलणं व्हायचं. त्याची पत्नी सर्वांच्या सुखदुखात सामील व्हायची, असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.