मुंबई : क्रिकेट विश्वातील महान खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश होतो. सचिन तेंडुलकरची प्रतिमा मलिन केल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अज्ज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोदवलाय. सचिनच्या परवानगीशिवाय त्याचं नाव, फोटो आणि आवाजाचा वापर केल्याच प्रकरण आहे. औषधी उत्पादनांच्या प्रचारासाठी हे सर्व करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात अज्ज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.
‘सचिनहेल्थ डॉट इन’ या वेबसाइटची माहिती देण्यात आली. सचिनचा थेट संबंध असावा, असं या वेबसाइटच नाव ठेवण्यात आलय. ही वेबसाइट सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा चुकीचा वापर करुन, या उत्पादनांचा प्रचार करत होती. सचिनच्या एका सहकाऱ्याने ही तक्रार नोंदवलीय.
सचिनने काय सांगितलं?
तक्रारदाराला सचिनच्या नावाचा वापर सुरु असलेली ही जाहीरात ऑनलाइन दिसली. सचिन तेंडुलकरने कधीच या कंपनीला आपलं नाव आणि फोटोंचा वापर करण्याची परवानगी दिली नव्हती. यामुळे सचिनची प्रतिमा मलिन होत होती.
अनेक कलमातंर्गत गुन्हा
आयपीसीच्या कलम 420 (फसवणूक), 465 आणि 500 मानहानी प्रकरणात अज्ज्ञात व्यक्तीविरोधात प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे. काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये वानखेडे स्टेडियमवर सामना झाला, त्यावेळी सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. सचिन मुंबई इंडियन्स टीमचा मेंटॉर आहे.