माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे सचिव संजीव पलांडे यांच्या वकिलाकडून सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आलीय. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे सचिव संजीव पलांडे यांच्या वकिलाकडून सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आलीय. त्यात वाझेने देशमुखांच्या सांगण्यावरूनच पोलीस खात्यात पुन्हा येण्यासाठी वाझेने अर्ज केल्याचं म्हटलंय, मात्र पुरावे नसल्याचंही जबाबात वाझेनं म्हटलंय.
वाझेकडे कोणतं रिक्वेस्ट लेटर?
देशमुखांच्या सांगण्यावरून आल्याचा कुठलाही पुरावा नसला तरी माझ्याकडे रिक्वेस्ट लेटर असल्याचं जबाबात म्हटलंय. सचिन वाझेने चांदीवली कमिशनच्या चौकशीत ही माहिती उलटतपासादरम्यान दिलीय.
माजी गृहमंत्र्यांना अटक, परमबीर सिंह फरार
परमबीर सिंह यांच्याकडून आरोप झाल्यानंतर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक झाल्याचंही पहायला मिळालं. तर तत्कालीन पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप झाले, त्यानंतर परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आलं. याच प्रकरणावरून भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. वाझे सरकारमधील मंत्र्यांचा वसूली एजंट असल्याचे आरोप झाले. त्यानंतर याप्रकरणात सीबीआय आणि ईडीचीही एन्ट्री झाल्याचं पहायला मिळालं. ईडी आणि सीबीआयकडून अनिल देशमुखांच्या घरावर धाडसत्र करण्यात आलं.
महाराष्ट्राला हादरवून सोडणारे प्रकरण
आधी मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी आणि नंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे सध्या अटकेत आहे. वाझेच्या अटकेनंतर महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत राजकारण तापल्याचं पहायला मिळालं. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुखांचं गृहमंत्रिपद गेलं. गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी किती जणांच्या अडचणी वाढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.