मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एका निनावी व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवरून ही धमकी आली होती. तसेच एका महिन्याच्या आत संजय राऊत आणि सुनील राऊत यांना स्मशनात पोहचवू, अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. संजय राऊत यांना दुसऱ्यांदा ही धमकी आली आहे. राऊत यांना आलेल्या धमकीची सरकार माहिती दिली आहे. पण सरकार काहीच करत नाही. सरकारनेच राऊत यांना संपवण्याची सुपारी घेतली की काय असं मला वाटतं, असा गंभीर आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी या धमकीची माहिती दिली. एका व्यक्तीने आपल्याला फोन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल दुपारी 4 सव्वाचार वाजता तीन ते चार कॉल माझ्या फोनवर आले. महिन्याभरात गोळ्या घालून तुम्हाला स्मशानात पाठवून देऊ. संजय राऊतांना सांगा सकाळची पीसी बंद करा. आम्ही तुम्हा दोघांना जीवे मारू. आमच्या फोनवर धमकी आली. राऊत साहेब औरंगाबादला होते. ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे धमकावणाऱ्याने मला फोन केला. त्याने महिनाभरात स्मशानात पोहोचवण्याची धमकी दिली आहे. अशा धमक्या वारंवार येत आहे. आम्ही सरकारला जाणीव करून दिली आहे. पण सरकार काहीच करत नाही. त्यामुळे राऊत साहेबांना नष्ट करण्याची किंवा ठार मारण्याची सरकारनेच सुपारी घेतल्याचं मला वाटतं, असं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
निनावी व्यक्ती : हॅलो, सुनील राऊत बोल रहा है ना
सुनील राऊत : हाँ बोल रहा हूँ
निनावी व्यक्ती : हाँ तो तेरे भाई को समजा, संजय राऊत को.
सुनील राऊत : कोण मेरा भाई?
निनावी व्यक्ती : संजय राऊत तुम्हारा भाई है ना?
सुनील राऊत : तो?
निनावी व्यक्ती : गोली मार देगा उसको
सुनील राऊत : किधर मारेगा गोली तू?
निनावी व्यक्ती : जिधर बोलेगा, उधर गोली मार देगा
सुनील राऊत : किधर बोल ना… भेज देता हूँ, गोली मारने के लिए
निनावी व्यक्ती : मार देगा गोली उसको
सुनील राऊत : किधर भेजू बोलना?
निनावी व्यक्ती : सुबह का भोंगा बंद करने को बोल
सुनील राऊत : अरे तू किधर गोली मारने का मै भेज देता हूँ… अरे कहाँ भेजू वो बोलना
निनावी व्यक्ती : अरे लवX मै क्या बोलता, फोन क्यो नही उठा रहा है वो… फट गई क्या?
सुनील राऊत : किस की?
निनावी व्यक्ती : संजय राऊत की… फोन तो उठाने को बोल
सुनील राऊत : आं..
निनावी व्यक्ती : कसम से बोलता हूँ अभी फोन किया तो…
सुनील राऊत : संजय राऊत मर्द आदमी है, समजे क्या, तेरे जैसे…
निनावी व्यक्ती : काय का मर्द? सुबह का भोंगा बंद करने को बोल
निनावी व्यक्ती : गोली मार दे गा….
सुनील राऊत : गोली? कौनसा लिमलेट का गोली मारे गा क्या, कौनसा गोली मारेगा? लिमलेट का? लिमलेट का गोली मारेगा क्या?
निनावी व्यक्ती : सुबह का भोंगा बंद करने को बोल, फोन उठाने को बोल. फोन क्यो नही उठा रहा है? महिने के अंदर श्मशान में पोहोचा देगा
सुनील राऊत : अरे छोड… छोड रे किधर गोली मारे गा…
निनावी व्यक्ती : श्मशान में पोहोचा देगा दोनो भाई को
सुनील राऊत : हां मार दे मार… किधर मारना है मार