मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ईडी कोठडीत (Sanjay Raut ED News) वाढ करण्यात आलीय. 14 दिवसांनी संजय राऊत यांची ईडी कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम 19 सप्टेंबरपर्यंत लांबला आहे. पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक (ED Arrest) केली होती. त्यानंतर संजय राऊतांच्या ईडी कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याचं पाहायल मिळालंय. 1 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. आता महिला उलटून गेला, तरी संजय राऊत हे कोठडीत आहेत.
ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडीत पाठण्यात आलं होतं. त्यानंतर पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी पाच सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. या कोठडीत वाढ केली जावी, अशी मागणी ईडीने केली होती. ईडीने केलेल्या मागणीनुसार संजय राऊतांची कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आलीय. मुंबईच्या गोरेगाव येथील पत्रा चाळीच्या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आपल्यावर करण्यात आलेले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचे सर्व आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले होते. संजय राऊत हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय राऊत यांच्यावर सहआरोपी प्रवीण राऊत यांच्यासोबत कांदिवलीतील पत्रा चाळ पुनर्विकास योजने पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाखाली त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
ईडीने सुरुवातीला संजय राऊत यांच्या परिवाराला पत्राचाळ प्रकरणी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातून 1.06 कोटी रुपयांचा लाभ झाल्याचा आरोप केला होता. पण नंतर हाच आकडा वाढून राऊत कुटुंबीयांना 2.25 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष फायदा झाल्याचा आरोप ईडीकडू करण्यात आला. दुसरीकडे राऊत कुटुंबीयांकडून हे आरोप फेटाळण्यात आलेत.