मुंबई : मस्जिद बंदर परिसरातील अब्दुल रहमान स्ट्रीटवर दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सात ते आठ दुकानांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग प्रथम एका दुकानात लागली. नंतर हळूहळू ती जवळपासच्या दुकानांपर्यंत पोहोचली आणि पाहता पाहता सुमारे 7 ते 8 दुकानांमध्ये ही आग पसरली.
अग्नीशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे.
ज्या ठिकाणी आग लागली ते सर्व ग्राउंड प्लस वन आणि चारची दुकान आहेत. आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करत आहेत.
नवी मुंबईतील रबाळे येथे पेपर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर अग्नीशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.