मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आर्थर रोड तुरुंगात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आणखी एक झटका बसला आहे. सीबीआय (CBI)ने देशमुखांना आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतले आहे. 100 कोटी वसुली प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयने देशमुखांना ताब्यात घेतले आहे. देशमुखांना विशेष सीबीआय कोर्टात हजर करुन कस्टडीची मागणी करण्यात येणार आहे. सीबीआयने निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेलाही तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. तसेच अनिल देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. (The CBI has arrested former Home Minister Anil Deshmukh from Arthur Road Jail)
अनिल देशमुख यांना याआधीच सीबीआय ताब्यात घेणार होते. मात्र 2 एप्रिल रोजी अनिल देशमुखांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना खांद्याच्या सर्जरीसाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्जरीनंतर मंगळवारी (काल) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आले. त्यानंतर बुधवारी (आज) त्यांनी सीबीआयने ताब्यात घेतले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख हे सचिन वाझेंसह पोलिस अधिकाऱ्यांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला होता. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून 100 वसुली करीत आहेत, असे पत्रात म्हटले होते. या आरोपानंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याआधी अँटेलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण योग्य तपास न केल्याचा आरोप करीत अनिल देशमुखांनी परमबीर सिंग यांना पोलिस आयुक्त पदावरुन काढून टाकले होते. यानंतर परमबीर सिंग यांनी पत्र लिहून देशमुखांवर आरोप केले. यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरण उघडकीस आले आणि याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली. त्यानंतर स्पेशल पीएमपीएल कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. (The CBI has arrested former Home Minister Anil Deshmukh from Arthur Road Jail)
इतर बातम्या
मुंबईच्या सोनाराची टिटवाळ्यात लूट, पंक्चर काढताना 1 कोटी 20 लाखांचे दागिने-रोकड लंपास
Nanded | Sanjay Biyani हत्याकांड, नांदेड एकटवटलं, अंत्ययात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटकेची मागणी