डोंबिवली (ठाणे) : डोंबिवलीत 72 वर्षीय आजीबाईच्या गळ्यातील जाडजूड चैन पाहून दोन चोरट्यांनी पाठलाग सुरु केला. सोसायटीच्या गेटवर येताच या चोरट्यांनी आजीबाईच्या गळ्यातील दागिने हिसकावले. त्यानंतर ते पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र ते दागिने बनावट होते. दागिने बनावटीचे असले तरी गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय. डोंबिवलीत भर दिवसा चैन स्नॅचिंग होत असल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागात आरएच 16 या घरात लक्ष्मी माधव राहतात. मात्र त्या सध्या त्यांच्या खंबाळपाडा येथे राहणाऱ्या मुलाकडे राहतात. अधूनमधून त्या एक-दोन दिवसांसाठी एमआयडीसी निवासी भागातील घरी येतात. नेहमीप्रमाणे त्या निवासी भागातील घरी येण्यासाठी निघाल्या. रस्त्यात दोन तरुण त्यांचा पाठलाग करीत होते. आजीबाईच्या गळ्यात जाडजूड चैन होती.
बंगल्याच्या गेटवर येताच पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाला आजीने विचारले की, तुम्हाला काय पाहिजे? चोरट्यांनी तुमच्या गळ्यातील चैन पाहिजे, असे उच्चारुन चैन घेऊन पसार झाला. सुदैनाने ही चैन बनावट होती. मानपाडा पोलीस ठाण्यात आजीबाईने तक्रार केली आहे. दागिने बनावटी असले तरी गुन्हा गंभीर आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे ज्येष्ठ नागरीकांना सावज करुन त्यांना लूटले जात आहे. ही चिंतेची बाब आहे.
हेही वाचा :
फेसबुकवरील मैत्री पडली महाग, नवी मुंबईत विधवा महिलेला सायबर गुन्हेगारांनी घातला 13 लाखांचा गंडा