अंबरनाथ : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये (Ambernath) ट्रक आणि रिक्षा यांच्यामध्ये एक भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात दोघांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आग लागलेला ट्रक (Burning Truck ) पाठीमागील बाजूने थेट रिक्षाला धडकला. यात रिक्षामधील प्रवाशांचा जीव गेला असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ पाईपलाईन रोडवर गंधकाच्या गोण्यांनी भरलेला ट्रक जात होता. यावेळी अचानक ट्रकने पेट घेतला. ट्रकने अचानक पेट घेतलेला असल्याने चालक सैरभैर झाला. ट्रक पेटल्याचं पाहून घाबरलेल्या चालकानं ट्रकमधून उडी मारून पळ काढला. चालू ट्रक चालकाविना तसाच रस्त्यावर सोडल्यानं मोठा अनर्थ घडला. चालकाविना असलेला मागील बाजूला सरकल्याने रिक्षाला जोरदार धडक बसली. ट्रकने पेट घेताच चालकाने अंबरनाथ पाईपलाईन रोडवर तसाच सोडल्याने अपघात झाला. अपघातावेळी चालकाने पळ काढल्याने रिक्षासह इतर वाहनाचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पेटत्या ट्रकची मागील बाजूने रिक्षाला धडक बसल्याने रिक्षातील दोन प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भीषण अपघात झाल्यानंतर आणखी कुणी जखमी आहेत का याचा शोध घेणे सुरू होते. ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचे तसेच इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे. पेटत्या ट्रक रस्त्यावरून गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रक चालकाचा शोध घेणे सुरू होते. या अपघातात आणखी कुणी जखमी झाले आहेत का याचा शोध सुरू आहे. ट्रक मागे आल्याने मागील बाजूला असलेल्या रिक्षाला जोरदार धडक बसली आहे. यामुळे रिक्षासर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. रिक्षातील दोघांसर आणखी कुणी जखमी झाले आहे याचाही शोध घेणे सुरू आहे. धावत्या ट्रकने पेट घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पेटता ट्रक विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अपघातग्रस्त ट्र्क आणि ट्रकचा चालक याचा शोध घेणे सुरू होते.
संबंधित बातम्या