मुंबई: मुंबईच्या लोकलमध्ये (mumbai local) कधीही पाहिलं तर तुफान गर्दी असते. लोकांना पाय ठेवायला जागा नसते एवढी लोकलमध्ये गर्दी असते. त्यामुळे रोज कुणाचे ना कुणासोबत लोकलमध्ये खटके उडत असतात. अशावेळी काही लोक समजूतदारपणे घेतात. तर काही लोक हातघाईवरच असतात. त्यातून मग माऱ्यामाऱ्या होण्याचे प्रकार घडत असतात. लेडीज डब्यातही (ladies coach) असे प्रकार वारंवार घडत असतात. आता लेडीज डब्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तीन तरुणी (ladies) एकमेंकीच्या झिंज्या ओढत हाणामारी करताना दिसत आहेत. लोकलमधील तरुणींचा हा दंगा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Kalesh B/w Two Woman in Local Train Over Seat pic.twitter.com/MrGJKvbZoW
— r/Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 16, 2022
या व्हिडीओत आधी दोन तरुणी नंतर तीन तरुणी हाणामारी करताना दिसत आहेत. या तरुणींमध्ये बसण्याच्या जागेवर हाणामारी झाली. बसायच्या सीटवरून दोन तरुणी आपआपसात भिडल्या. एकीने दुसरीच्या झिंज्या ओढल्या. त्यानंतर तिच्या कानाखाली ओढली. हे पाहून तिसरी महिला या भांडणात आली आणि दोघींनी मिळून पहिल्या तरुणीला बेदम चोप दिला. या वाहत्या गंगेत इतर महिलांनीही हात धुवून घेतला. इतर महिला मात्र बघ्याच्या भूमिकेत होत्या. हे भांडण सोडवण्याच्या फंदात कुणीच पडलं नाही.
दोन्ही तरुणी प्रचंड रागात असल्याचं पाहायला मिळालं. एकमेकींकडे हात दाखवून आधी तू तू मै मै सुरू झाली. नंतर थेट शाब्दिक चकमकीवरून हाणामारीवर प्रकरण आलं. ही हाणामारी सुरू असताना इतर महिला आपल्या जागेवर बसलेल्या होत्या. त्या मध्ये पडल्या नाहीत. कुणीही आपल्या जागेवर उठलं नाही.
@gharkekalesh नावाच्या ट्विटर आयडीवर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. लोकल ट्रेनमध्ये जागेसाठी दोन महिलांमध्ये झालं क्लेश, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. अवघ्या 31 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 34 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच शेकडो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊसही पडताना दिसत आहे.
काहींनी मुंबईच्या लोकलमधील ही किरकोळ घटना आहे. नेहमीच असा प्रकार घडतो. तर, स्त्रियांचे केस त्यांची कमजोरी आहे. ते व्यवस्थित करूनच मैदानात उतरलं पाहिजे, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.