Mumbai Fraud : नितीन राऊत यांच्या नावाने फसवणूक, ऊर्जा विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखो रुपये लुटले

| Updated on: Jul 19, 2022 | 7:52 PM

आरोपीकडून बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, रबर स्टॅम्प, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Mumbai Fraud : नितीन राऊत यांच्या नावाने फसवणूक, ऊर्जा विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखो रुपये लुटले
ऊर्जा विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखो रुपये लुटले
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा नातेवाईक असल्याचे सांगत ऊर्जा विभागात सरकारी नोकरी (Government Job) मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 च्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात फसवणुकीचे दोन डझनहून अधिक गुन्हे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. संदीप कृष्णा राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने आतापर्यंत किती तरुणांची फसवणूक केली आणि एकूण किती रुपयांना चुना लावलाय, याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

आरोपीला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

गुन्हे शाखा युनिट 12 चे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले की, आरोपीकडून बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, रबर स्टॅम्प, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील तरुणांना लाखोंचा गंडा

गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत शेकडो तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. तर या आरोपीचा ऊर्जामंत्री नितीन राउत यांच्याशी काहीही संबंध नाही आणि कोणाचाही संबंध नाही आहे. संदीप राऊत असे आरोपीचे नाव असून, तो सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुंबईतील गेस्ट हाऊसमध्ये राहून तो उर्जा विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रभरातील तरुणांना गंडा घालायचा. लाखो रुपये घेऊन आरोपी संदिप फरार झाला होता. (Youth cheated of lakhs of rupees on the pretext of employment in power department)

हे सुद्धा वाचा