उल्हासनगरात अवघ्या 20 रुपयांसाठी तरुणाची हत्या, पोलिसांनी 2 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या

| Updated on: May 24, 2021 | 6:57 PM

एका तरुणाची अवघ्या 20 रुपयांसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे (youth murder in Ulhasnagar only for 20 rupees)

उल्हासनगरात अवघ्या 20 रुपयांसाठी तरुणाची हत्या, पोलिसांनी 2 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या
पोलिसांनी 2 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या
Follow us on

उल्हासनगर (ठाणे) : एका तरुणाची अवघ्या 20 रुपयांसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोनच तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अनिल आहुजा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो एका चहाच्या दुकानात काम करायचा (youth murder in Ulhasnagar only for 20 rupees).

नेमकं काय घडलं?

अनिल हा उल्हासनगरमधील कॅम्प 5 भागातील जय जनता कॉलनीत त्याच्या कुटुंबासह वास्तव्याला होता. आरोपी साहिल मैराळे हा रविवारी (22 मे) रात्री साडेदहाच्या सुमारास जय जनता कॉलनीतील एका गल्लीत गांजा पीत बसला होता. यावेळी तिथून जात असलेल्या अनिलकडे त्याने 20 रुपये मागितले. मात्र अनिल याने त्याला पैसे द्यायला नकार दिल्यानं साहिल याला राग आला. त्याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून अनिलवर सपासप वार केले.

पोलिसांनी 2 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या

यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिल याला तातडीने मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आरोपी साहिल मैराळ याचा शोध सुरु केला. पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपी साहिल याला कॅम्प 4 च्या परिसरातून ताब्यात घेतलं.

पोलिसांची प्रतिक्रिया

आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला हत्येसाठी वापरलेला चाकू आढळून आला. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी साहिल मैराळ विरोधात कलम 302,504 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे (youth murder in Ulhasnagar only for 20 rupees).

हेही वाचा : ब्यूटी पार्लरच्या बहाण्याने घराबाहेर पडली, लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच बायको पळाली