घरफोड्या करणाऱ्या चोराचा मुंबईत 1 कोटीचा फ्लॅट, ऑडी कार, कोण आहे हा श्रीमंत चोर?

| Updated on: Jul 06, 2024 | 3:23 PM

घरफोड्या करणाऱ्या साध्या चोराच्या चौकशीतून जी माहिती समोर आलीय, त्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. महत्त्वाच म्हणजे गुजरात पोलिसांनी या चोराला अटक केली. मुस्लिम महिलेसोबत लग्न करण्यासाठी या चोराने नाव बदलून अरहान नाव धारण केलं होतं.

घरफोड्या करणाऱ्या चोराचा मुंबईत 1 कोटीचा फ्लॅट, ऑडी कार, कोण आहे हा श्रीमंत चोर?
Rohit Kanubhai Solanki
Follow us on

गुजरात पोलिसांनी नुकतीच एका चोराला अटक केली आहे. विविध राज्यात या चोराचा दरोडेखोरीचा इतिहास आहे. मागच्या महिन्यात वापी इथे झालेल्या 1 लाखाच्या चोरी प्रकरणात रोहित कनुभाई सोलंकी हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी या चोराची चौकशी सुरु केली, त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. चौकशीतून रोहित कनुभाई सोलंकीच्या ऐशोरामी लाईफस्टाइल बद्दल पोलिसांना समजलं. पोलीस चौकशीत रोहित सोलंकीने 19 दरोडे टाकल्याची कबुली दिली.

चौकशीत पोलिसांना समजलं की, ‘मुंबईत रोहित सोलंकीचा 1 कोटी रुपयाचा फ्लॅट आहे. त्याच्याकडे आलिशान ऑडी कार सुद्धा आहे’ चौकशीत त्याने 19 ठिकाणी दरोडे घातल्याची कबुली दिली. यात तीन वलसाड, एक सूरत, एक पोरबंदर, एक सेलवल, दोन तेलंगण, आंध्र प्रदेश-मध्य प्रदेशात प्रत्येकी दोन दरोडे घातल्याची कबुली त्याने दिली. लाचेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सहा चोऱ्या केल्याची कबुली त्याने दिली.

मुस्लिम महिलेसोबत लग्नासाठी नाव बदललं

रोहित सोलंकीचा वेगवेगळ्या राज्यात गुन्ह्यांचा इतिहास आहे. मुस्लिम महिलेसोबत लग्न करण्यासाठी त्याने नाव बदलून अरहान नाव धारण केलं होतं. सोलंकीची चोरीची पद्धत सुद्धा वलसाड जिल्हा पोलिसांनी शोधून काढली. चोरी करण्यासाठी रोहित सोलंकी आलिशान हॉटेलमध्ये रहायचा. विमानाने प्रवास करायचा. दिवसा हॉटेलची टॅक्सी बुक करायचा. चोरी करण्याआधी दिवसा सोसायट्यांमध्ये टेहळणी करायचा. आरोपी मुंबईत नाईट क्लब आणि डान्स बारमध्ये पार्टी करायचा असं पोलिसांनी सांगितलं. त्याला ड्रग्ज सुद्धा व्यसन होतं. त्यासाठी महिना 1.50 लाख रुपये खर्च करायचा.