परभणी : परभणीतून (Parbhani) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणीमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला (Main accuse of murder) पकडण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. परभणी याप्रकरणी आता अधिक तपास केला जातो आहे. परभणीच्या नानलपेठं पोलिस (Parbhani Police) ठाण्याच्या हद्दीत मदिना पाटी जवळ ही हत्येची घटना घडली. एका 16 वर्षांच्या तरुणाचा खून करण्यात आला. दत्ता गणेश मिरासे असं 16 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून आता या हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. सध्या परभणी पोलिस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत.
जागेच्या वादातून एका 16 वर्षीय युवकाचा फरशीने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. नानलपेठ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मदिना पाटी या भागात ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दत्ता गणेश मिरासे असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे . तो शहरातील रामेश्वर प्लॉट भागातील रहिवाशी होता.
घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान , घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शव ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, दहा वाजेपर्यंत कुणी फिर्याद दिली नसल्याने अद्यापपर्यंत तरी गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आहेत.
लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी दिली आहे. हत्येच्या या घटनेमुळे परभणी शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलाय. त्यामुळे पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होते, हे ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमका या हत्येचा घटनाक्रम काय होता, याबाबत पोलिासांकडून तपासाला वेग आला आहे.
मुंबईतील चारकोप तलावात दोन तरुण बुडाले, एकाला सुखरूप बाहेर काढलं, दुसरा…
वर्ध्यात दारूच्या नशेतील नोकराला लुटले, 47 लाखाचे दागिने लंपास, अवघ्या काही तासात आरोपी अटक
सांगलीत चक्क रेल्वे पोलिसाला ऑनलाईन गंडा, लाखो रुपयांची केली फसवणूक