मंड्या : पाच जणांच्या हत्याप्रकरणात शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी (Karnataka Police) कर्नाटकमधल्या मंड्या जिल्ह्यातील कृष्णा राजा सागर (Krishna Raja Sagar) येथून एका महिलेला अटक (Woman arrested) केली आहे. या महिलेवर पाच जणांच्या हत्येचा आरोप आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये एक महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. अनैतिक संबंधातून पाच जणांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. लक्ष्मी (30) लक्ष्मीची मुले कोमल (8) राज (10) आणि कुणाल (5) तसेच तिचा भाचा गोविंदा 13 यांची हत्या करण्यात आली आहे. आरोपी महिलेचे पीडित लक्ष्मीचा पती गंगाराम याच्याशी अनैतिक संबंध होते. गंगाराम हा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यापारी आहे. संबंधित महिलेने गंगारामकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र आपले आधीच लग्न झाल्यामुळे दुसरे लग्न करता येणे शक्य नसल्याने गंगारामने या महिलेला सांगितले. मात्र गंगाराम आपल्याशी लग्न करत नाही, याचा राग आल्याने आरोपी महिलेने गंगाराम याचे अख्खे कुटुंबच संपवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा राजा सागर येथील रहिवासी असलेल्या गंगारामचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या महिलेने गंगारामकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र आपले आधीच लग्न झाल्यामुळे दुसरे लग्न करता येणे शक्य नसल्याने त्याने संबंधित महिलेला सांगितेल. मात्र ही महिला लग्न करण्याच्या जिद्दीने झपाटली होती. याच द्वेषातून तिने गंगाराम याची पत्नी लक्ष्मी आणि तिच्या तीन मुलांसह भाच्याला संपवले. संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून, तीने हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी महिलेने हत्येचा एकही पुरावा मागे न ठेवल्याने संबंधित प्रकरणाचा तापस लावणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली असावी असे पोलिसांना वाटवे म्हणून संबंधित महिलेने घरातील काही सोन्याचे दागिने देखील चोरले. मात्र मुलांची देखी हत्या झाली असल्याने पोलिसांना वेगळा संशय आला. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये एक महिला गंगाराम याच्या घरी जाताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी या महिलेबद्दल अधिक चौकशी केली असता या महिलेचे आणि गंगारामचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच संबंधित महिलेने खुनाची कबुली दिली.
विक्की नगराळेला फाशीची शिक्षा का नाही? उज्वल निकमांनी कारण सांगितलं, पुन्हा कोर्टात खटला जाणार?