नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामध्ये चार लोकांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक लहान मुल आणि एका पुरुषाचा सहभाग आहे. या हत्येच्या घटनेमागे अफेअरची शक्यता वर्तवली जात आहे. एका घरमालकाला शंका होती की त्याची सून आणि भाडेकरुमध्ये अफेअर असल्याची शंका होती. या शंकेतूनच घरमालकाने हे हत्याकांड घडवून आणल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Murder of four including daughter-in-law and tenant by father-in-law on suspicion of affair)
हा धक्कादायक प्रकार गुरुग्रामच्या राजेंद्र पार्क पोलीस ठाणे परिसरातील आहे. सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात या हत्याकांडाची माहिती दिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. संबंधित आरोपीने सून, भाडेकडून, भाडेकरुची पत्नी आणि त्यांच्या एका मुलाची हत्या केली. तर एक लहान मुलगी जखमी झाली आहे.
हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केलं. आरोपीला सून आणि भाडेकरुमध्ये अनैतिक संबंध असल्याची शंका होती. या शंकेतूनच आरोपीने हे हत्याकांड घडवून आणलं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
डीसीपी दीपक सहारण यांनी दिलेल्या माहितीनुसार घरात एकूण चार मृतदेह सापडले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपीनं धारदार शस्त्राने हल्ला केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यात एक लहान मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हत्याकांडाचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेचं पतीसोबत भांडण झालं. पतीने तिला भांडखोर म्हटलं. तुला भांडणंच लागतात, असं पती तिला भांडणादरम्यान म्हणाला. हे शब्द पत्नीच्या जिव्हारी लागले. तिने रागात पती विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी स्वत:ची जीभ ब्लेडने कापली. त्यानंतर घरात मोठा गदारोळ झाला. महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संबंधित घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने इतका टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, असं मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केलं जातंय. महिलेचं नाव बबली असं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संबंधित घटना ही रविवारी (12 सप्टेंबर) दुपारी घडली. पती-पत्नीमध्ये नेमका वाद काय झाला? ते अद्याप समोर आलेलं नाही. पण दोघांची घरची परिस्थिती नाजूक आहे. त्यांना दोन मुलं आहेत. आर्थिक अडचणींमुळे दोघांमध्ये सतत वाद होत असायचा, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
इतर बातम्या :
Murder of four including daughter-in-law and tenant by father-in-law on suspicion of affair