नागपूर : नागपूर जीपीओ ऑफिसात एका पार्लस (Parcel)मध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट (Blast) झाल्याची घटना घडली आहे. शेतामधील प्राण्यांना हकलण्यासाठी वाजविण्यसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर गनमध्ये भरणारा बार भरून आवाज करणारा पदार्थ होता, त्याचा स्फोट झाला. हे पार्सल नाशिकवरून आलं होतं आणि वर्धा येथे जाणार होतं. सगळं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ज्वलनशील पदार्थ (Flammable Material) अशा प्रकारे पार्सलमध्ये पाठविता येते का याचाही तपास केला जात आहे. विशेष बाब म्हणजे नागपूरचे जनरल पोस्ट ऑफिस सिविल लाइन्स परिसरात असून जवळच विभागीय आयुक्त कार्यालय आणि मंत्र्यांचे बंगले असलेलं रविभवन हे सर्किट हाऊस आहे. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घरही जनरल पोस्ट ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अशा व्हीव्हीआयपी परिसरात स्फोट होणं नक्कीच गंभीर बाब आहे.
नागपूरच्या जीपीओ म्हणजे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आज संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास एक स्फोट झाला आहे. नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आलं होतं. तेच पार्सल नागपूरच्या मुख्य पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी त्याला हाताळत असताना त्यामध्ये छोटा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचारी घाबरले. लगेच पोलिसांना त्याची सूचना देण्यात आली.
सीताबर्डी पोलिस स्टेशनचा पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. ते पार्सल तपासण्यात आले असता त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी जे अल्प ते मध्यम प्रतीचे स्फोटक वापरले जातात ते मिळून आले. नाशिकमधील एका अधिकाऱ्याने वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी हे पार्सल पाठवले होते. पोलिसांनी संबंधित स्फोटकं जप्त केली असून ते पार्सल कोणत्या उद्दिष्टाने पाठवण्यात आले होते त्याचा तपास सुरू केला आहे. (Explosion of flammable material in a parcel at GPO office Nagpur)