बुलडाणा : बुलडाण्यात चार दिवसांपूर्वी एका तरुणीने आत्महत्या केली होती. तिने लिहिलेली सुसाईड नोट भगवद्गीतेत सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. निल्या आणि गण्या यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप युवतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी एक जण हा पीडितेचा चुलत भाऊ असल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
बुलडाणा जिल्ह्यातील नांद्रा-कोळी भागात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. 20 सप्टेंबरला तिने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालं. मात्र काल तिच्या आत्महत्येचं कारण उलगडलं. भगवद्गीतेमध्ये युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलं आहे.
काय आहे सुसाईड नोटमध्ये?
पीडितेने आरोपींची नावंही चिठ्ठीत लिहिली होती. निल्या आणि गण्या यांनी माझ्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगू शकत नसल्याने मी आत्महत्या करत आहे, असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दोघा जणांपैकी एक तिचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे.
पोलिसात तक्रार
दरम्यान, ही चिठ्ठी मिळताच तरुणीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेत सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
मध्य प्रदेशात जिम प्रशिक्षकाची आत्महत्या
दुसरीकडे, जिम प्रशिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. धाकटा भाऊ क्रिकेट खेळण्यासाठी बोलवायला त्याच्या खोलीत गेला, तेव्हा हा प्रकार समोर आला होता. माझ्या दोन्ही बहिणींना माझा चेहरा दाखवू नका, तसंच माझ्या प्रेयसीला अंत्यसंस्काराना बोलवू नका. माझी ही अंतिम इच्छा पूर्ण केली नाहीत, तर माझी आत्मा फिरत राहील, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. मध्य प्रदेशातील इंदौर शहरात कँटोन्मेंट परिसरात हा प्रकार घडला होता.
धाकट्या भावाने सर्वप्रथम मृतदेह पाहिला
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. संयोगितागंज पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणाचे नाव गोपाल वर्मा आहे. तो जिम ट्रेनर होता. गोपालला नितेश आणि अंकुश असे दोन भाऊ आहेत. घटनेच्या वेळी त्याचे आई -वडीलही घरात होते. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी त्याचा भाऊ नितेशने फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.
चुलत बहिणींशी वाद
जिम प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गोपाळचे काम काही महिन्यांपासून बरे चालले नव्हते. तसेच गेल्या काही काळापासून त्याच्या काकांच्या कुटुंबासोबत मालमत्तेवरुन वाद सुरु होते. त्याच्या काकांना दोन मुली आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे. या वादात त्याच्या दोन्ही चुलत बहिणीही मध्ये पडत होत्या. यामुळे तो चुलत बहिणींवरही काही दिवस रागावला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?
“मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. माझी शेवटची इच्छा हीच आहे की माझ्या दोन्ही बहिणी गोलू आणि मुन्नू यांना माझा चेहराही दाखवू नका. माझी त्या दोघींवर कोणतीही नाराजी नाही. मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. प्रिती सिलावटलाही माझ्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ देऊ नका, हीच माझी अंतिम इच्छा आहे, ती पूर्ण केली नाही, तर माझा आत्मा कायम भटकत राहील. बाकी या कोणावर माझी नाराजी नाही.” असं गोपालने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
संबंधित बातम्या :
सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या
ठाण्यात महिलेचा गळफास, आत्महत्येपूर्वी मैत्रिणींना व्हिडीओ पाठवून पतीवर धक्कादायक आरोप
भाजयुमोच्या 28 वर्षीय नेत्याची आत्महत्या, नस कापून गळफास, सुसाईड नोटमध्ये प्रेयसीवर आरोप