नागपुरात हत्येसाठी निघालेली टोळी CCTV मध्ये कैद, भररस्त्यात दहशतीचा नंगानाच, पोलीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल

| Updated on: Jul 16, 2021 | 12:36 AM

पाचपावली परिसरात कोणाच्या तरी हत्येचा प्लॅन या टोळीने केला होता, मात्र वाटेत पोलीस दिसल्याने टोळी सैरभैर झाली. पोलिसांना यांची माहिती मिळताच ते सतर्क होऊन ऍक्शन मोड वर आले

नागपुरात हत्येसाठी निघालेली टोळी CCTV मध्ये कैद, भररस्त्यात दहशतीचा नंगानाच, पोलीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल
Follow us on

असा एकही दिवस जात नाहीय ज्यादिवशी नागपुरात क्राईमची एखादी मोठी घटना घडत नसेल. वैयक्तिक कारणातून
होणारे गुन्हे वेगळे. पण सामुहिकपणे केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांमुळे पुन्हा एकदा नागपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेवर
सवाल उपस्थित करणारे आहे. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा आला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दहा पंधरा जणांच्या
एका टोळीनं भररस्त्यात दहशतीचा नंगानाच केला. हातात लाठ्याकाठ्या घेऊन लोकांमध्ये भीती
निर्माण केली. विशेष म्हणजे ही टोळी एकाची हत्या करायला निघाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

काय घडलं रात्री नेमकं 8 वाजता?
नागपूर शहरातील गुन्हेगार पोलिसांना जुमानत नासल्याच पुन्हा एकदा उघड झाल आहे,
शांती नगर परिसरात रात्री 8 च्या सुमारास 10 ते 15 युवक हातात लाठ्याकाठ्या तलवारी घेऊन परिसरात दहशत
माजवत असल्याची दृश्य CCTV मध्ये कैद झाली आहेत. शांतीनगर परिसरातील दहीबाजार, भीम चौक इत्यादी
परिसरातून हे युवक भरधाव वेगाने दुचाकीवरुन फिरून दहशत माजवत होते. मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली
परिसरात कोणाच्या तरी हत्येचा प्लॅन या टोळीने केला होता, मात्र वाटेत पोलीस दिसल्याने टोळी सैरभैर झाली.
पोलिसांना यांची माहिती मिळताच ते सतर्क होऊन ऍक्शन मोडवर आले. शहरात सांचारबंदीचे नियम लागू
असल्याने संध्याकाळच्या वेळी चौकाचौकात पोलीस तैनात असताना 10 ते 15 युवक शस्त्रासह एकत्रित येऊन
दीड तास दहशत माजवतात आणि पोलिसांना याचा सुगावा देखील लागत नाही यावरून पोलिसांच्या कार्यशैलीवर
प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मात्र माहिती मिळताच पोलिसांनी यांचा शोध घेत 13 आरोपीना अटक केली. त्यांच्याकडचे
शस्त्र जप्त केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक सध्या दहशतीत असून भीतीच वातावरण परिसरात आहे.