नागपूर रेल्वेतील दोन वरिष्ठांची तक्रार महिला अधिकाऱ्यानी सदर पोलिसांत केली. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात सदर पोलिसांनी छेडखानी आणि जातिवाचक शिविगाळीचा गुन्हा दाखल केलाय. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास कुमार कश्यप आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अविनाश कुमार आनंद अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
सदर पोलीस ठाण्याअंतर्गत दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेचा विभाग येतो. तक्रारकर्ती महिला अधिकारी 57 वर्षांची आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, वरील दोन्ही अधिकारी त्यांना वारंवार कॅबीनमध्ये बोलावित होते. जातिवाचक शिविगाळ करून छेडखाणी करीत होते. याविरोधात आवाज उचलला असता सदर महिला अधिकाऱ्याचा आणखी त्रास अधिकच वाढला. फाईल मागण्याच्या बहाण्याने बोलावून त्रास दिला जात असल्याची महिलेची तक्रार आहे. या महिला अधिकाऱ्याने ऑगस्ट 2021 मध्येच याची लेखी तक्रार सदर पोलिसांत केली होती. तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सदर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सदरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती गुरनुले तपास करीत आहेत.
वाठोड्यातील जमीन फसवणूक प्रकरणाला कलाटणी मिळाली. गुंड राजू भद्रेंची पत्नी आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्धमाननगरातील तवरलाल छाबरानी, सक्करदऱ्यातील संगीत राहाटे, सुजातानगरातील विजय पत्रे, राणी दुर्गावती नगरातील मुरलीधर निमजे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाशी संबंधित जमीन बळकवण्याच्या प्रयत्नात दोन गटांत वाद आहे. आदिवासी उन्नती गृहनिर्माण सोसायटीतील ही जमीन व्वेटा कॉलनीतील अशोक खट्टर यांनी 40 लाखांत खरेदी केली होती. राजू भद्रे आणि त्याच्या साथीदारांनी बनावट कागदपत्र बनवून या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप आहे. याविरोधात खट्टर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. अधिक तपास केल्यास या प्रकरणी आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
Naxal attack in Bihar: नक्षलवाद्यांकडून 4 जणांना घराबाहेर फाशी, घर उडवले