Boy friend Girl friend crime Story: ‘प्रेमवीर अनेक वेळा प्यार में चांद तारे…’ आणण्याचे आश्वासन प्रेयसीला देतात. कवींना सुद्धा आपली प्रेयसी ‘चाँद का तुकडा’ वाटते. प्रियकर आणि प्रेयसी यांच्या प्रेमकथेवर अनेक चित्रपटसुद्धा निघाले आहेत. परंतु नागपूरमधील प्रेमीवर जरा अनोखेच निघाले. त्यांनी प्रेयसीसाठी जे काही केले, त्याचा धक्का पोलिसांना बसला. हा प्रकार करणारे दोघे सख्ये भाऊ अल्पवयीन होते. त्यामुळे त्यांच्या पालकांना बोलवून समज देऊन सोडण्यात आले. या दोघ भावांनी प्रेयसीला आयफोन देता यावा, यासाठी घरफोडी केली होती.
गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन दोन सख्ख्या भावांना नागपूर जिल्ह्यातील कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूरच्या कळमना पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पहाटेच्या पाच वाजताच्या सुमारास दोन अल्पवयीम मुले दिसली. ही दोन्ही मुले कामना नगर रेल्वे स्टेशन फाटक जवळ फिरत होती. पोलिसांना संशय आला. त्यांनी त्या दोघांना विचारणा सुरु केली. ते दोन अल्पवयीन मुले सख्खे भाऊ निघाले. पोलिसांना पाहून ते पळण्याच्या तयारीत होते.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस सुरु केली. त्यावेळी त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले. त्यांनी घरफोडी का केली त्याचे कारण पोलिसांना सांगितले. ते ऐकून पोलिसांना शॉक बसला. या दोघांनी ही घरपोडी आपल्या गर्लफ्रेंडसाठी केली.
तिला आयफोन विकत घेऊन देण्यासाठी त्यांची घरफोडी केल्याचे सांगितले. घरफोडी करणारे दोघेही सख्खे भाऊ आहे. त्यांच्यावर यापूर्वीचे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेच. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ते मुले अल्वपयीन असल्यामुळे त्यांच्या पालकांना बोलून त्यांना सूचना पत्र देऊन सोडण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चर्चा परिसरात चांगलीच झाली.