नागपूर: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं लॉकडाऊन लादण्यात आलाय. त्यामुळे अनेक सेवांवर निर्बंध लादण्यात आलेत. परंतु या काळात ड्रग्जची तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढलीय. नागपूरच्या रेल्वे पोलिसांनीसुद्धा (Nagpur Railway Police) महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर जप्त केलीय, एका बेवारस बॅगमध्ये या ड्रग्जच्या पुड्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. (Nagpur Railway Police seizes Rs 2 lakh worth of brown sugar)
नागपूर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडी पोहोचली असता नियमित पेट्रोलिंगवर असलेल्या रेल्वे पोलिसांना जनरल बोगीमध्ये एक बेवारस बॅग दिसली, त्या बॅगबद्दल विचारपूस केली असता कोणीही त्यावर आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे ती बॅग ताब्यात घेऊन चेक केली असता त्यात छोट्या छोट्या पुड्या दिसून आल्या. त्यानंतर त्याची माहिती अमली पदार्थ विरोधी विभागाला देण्यात आली असता ते ब्राऊन शुगर असल्याचं उघड झालं. त्या 310 पुड्यांमधील ब्राऊन शुगरचं 21.490 ग्रॅम वजन होतं, त्याची बाजारात किंमत 2 लाख 14 हजार 900 रुपये असल्याचा अंदाज आहे.
रेल्वेच्या मार्गाने अशा प्रकारे मादक पदार्थांची तस्करी केली जात असल्याने खळबळ माजलीय, मात्र ही बॅग कोणाची होती आणि कोण याची तस्करी करत होता याचा शोध आता रेल्वे पोलीस घेत आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वीसुद्धा नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai police) धडक कारवाई करत ब्राऊन शुगर जप्त केली होती. अंमली पदार्थांची विक्री (Brown Sugar Drugs seized) करण्याऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. रुपये 5 लाख किमतीचे ब्राऊन शुगर अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले होते. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सलीम रहमान इनामदार यांना 11 मार्च रोजी सुत्रांकडून वाशी सेक्टर 10 येथील श्रद्धा इमारती जवळ काही लोक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले होते. इनामदार यांनी सदर बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचला होता.
संबंधित बातम्या
अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा
Nagpur Railway Police seizes Rs 2 lakh worth of brown sugar