मैत्रीमध्ये दगा, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच…नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

| Updated on: Aug 24, 2024 | 10:40 AM

नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत राहणारी पीडीत मुलगी नालासोपारा येथे आपल्या मैत्रिणीकडे आली होती. नालासोपाऱ्यातील मैत्रिणीला अधून मधून पीडीत मुलगी भेटायला यायची.

मैत्रीमध्ये दगा, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
crime
Follow us on

बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेविरोधात आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. पण हाय कोर्टाने बंदला बेकायदा ठरवलं. त्यामुळे आज महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. बदलापूरनंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबईपासून जवळ असलेल्या नालासोपाऱ्यात सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. नालासोपार्‍यात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

तुळींज पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मुंबईत राहणारी पीडीत मुलगी नालासोपारा येथे आपल्या मैत्रिणीकडे आली होती. नालासोपाऱ्यातील मैत्रिणीला अधून मधून पीडीत मुलगी भेटायला यायची. त्यावेळी फोटो स्टुडिओ मध्ये काम करणाऱ्या तरुणासोबत तिची ओळख झाली होती. गुरुवारी आरोपी तरुणाने याच ओळखीचा फायदा उचलत पीडित तरुणीला नालासोपारा स्थानकात भेटण्यासाठी बोलावले.

पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा

फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून नालासोपारा पूर्व नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे तिच्यावर दोन जणांनी मिळून आळीपाळीने जबरदस्तीने बलात्कार केला. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.