नांदेड : पाच वर्षांच्या आरोही या चिमुकलीचा मृतदेह नदीत आढळून आला. त्यामुळे नांदेडमध्ये (Nanded Crime News) एकच खळबळ उडालीय. ही मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर या मुलीचाा मृतदेह हाती लागल्यानंतर तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय. विशेष म्हणजे या मुलीचे आईवडील अंध (Blind parents lost daughter) असून ते अत्यंत गरीब आहे. आरोहीचे वडील रेल्वेत खाण्याचं साहित्य विकून उदरनिर्वाह करतात. 16 ऑगस्टपासून आरोही बेपत्ता होती. तिचा शोध सुरु होता. पोलिसांतही मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी दिली होती. शिवाजीनगर पोलीस (Shivaji Nagar Police, Nanded) स्थानकात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यान, आरोहीच्या वडिलांनी आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याची भीती व्यक्त केली आहे. आरोपीने गैरकृत्य करुन हत्या केली आहे आहे का, याचाही तपास सुरु आहे. दरम्यान, आरोहीच्या वडिलांनी आपल्या भावावरच मुलीच्या हत्येचा आरोप केला आहे.
16 ऑगस्ट रोजी दुपारी आरोही बेपत्ता झाली होती. ज्या दिवशी आरोपी बेपत्ता झाली होती, त्याच दिवशी आरोही आणि तिची मैत्रिण घरातील पायऱ्याजवळ खेळत होते. यावेळी तिचा काकाही घरी आला होता. दरम्यान, दुपारी काका घरी जायला निघाला, तेव्हा तो बाहेर जाऊन फोनवर कुणाशीतरी बोलत राहिला होता, असं आरोहीचे वडील अंकुश हट्टेकर यांनी म्हटलंय. तुझी आई झोपली का, असं आरोहीला काकाने विचारालं. इशारे करुन तिला आपल्या जवळ बोलावलं आणि तो तिला घेऊन गेला, असा आरोप अंकुश हट्टेकर यांनी केला आहे. आरोहीला घेऊन जाताना काकाही काही लोकांनी पाहिलं असल्याचंही अंकुश हट्टेकर यांनी सांगितलं आहे.
नांदेडच्या श्रावस्ती नगरमध्ये अंकुश आणि शितल हट्टेकर हे दाम्पत्य राहतं. आपली पाच वर्षांची मुलगी हरवल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आता मुलीचा मृतदेहच घरी आल्यानं या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृलीचा मृतदेह पाहून तिच्या शितल हट्टेकर यांनी केलेला आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता. वाजेगाव जवळील पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात आरोहीचा मृतदेह आढळून आलाय. अज्ञात आरोपीचा तिची हत्या करुन मृतदेह नदीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. तर आरोहीच्या वडिलांनी दिलेल्या धक्कादायक आरोपांमुळे आता आरोहीच्या मृत्यूबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे. सध्या शिवाजीनगर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.