नाशिक : वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे शेजारील चिकनच्या दुकानदारानेच हा हल्ला केला आहे. या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर दुकानदार हल्ला करुन फरार झाला आहे. जखमी भावांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
चिकन दुकानदाराने हल्ला का केला?
वडाळा नाका येथे हल्लेखोरांचं चिकनचं दुकान आहे. या दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या दोघा भावांनी चिकन दुकानदाराची तक्रार पोलिसात केली होती. याच गोष्टीच्या रागातून चिकन दुकानदाराने दुकानात असलेल्या कोयत्याने दोघा भावांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमीर खान आणि मझर खान हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चिकन दुकानदाराने भर दिवसा हा हल्ला केला आहे. यावेळी रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरु होती. रोजच्या प्रमाणे ये-जा करणाऱ्या माणसांची गर्दी होती. मात्र, आरोपीने तरीही वर्दळ सुरु असलेल्या रस्त्यावर दोघा भावांवर हल्ला केला. संबंधित प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. या हल्ल्यानंतर काही नागरिक घटनास्थळी थांबवतात. ते हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येतं. विशेष म्हणजे आरोपीची पोलिसात तक्रार केली म्हणून त्याने येवढं भीषण कृत्य केलं. मग त्याला पोलिसांची भीती नाही का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
संबंधित हल्ल्याची घटना घडल्यानंतर या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पण पोलिसांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा दावा परिसरातील दुकानदारांनी केला आहे. पोलिसांनी वेळेवर कारवाई न केल्याने दुकानदारांमध्ये संताप आहे. दरम्याम, हल्ल्यानंतर हल्लेखोर चिकन दुकानदार पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
गजबजलेला रस्ता, भर वर्दळमध्ये चिकन दुकानदाराचा कोयत्याने दोघांवर हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद #nashikcrime #crime #crimenews pic.twitter.com/atxhJhV4sD
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) July 26, 2021
हेही वाचा :
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, प्रचंड मारहाण, प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न
वसई किनाऱ्यावर सुटकेसमधून दुर्गंध, उघडून पाहिलं तर धडापासून वेगळा असलेला महिलेचा मृतदेह