Crime News : पतीने गळफास घेऊन जीवन संपवले, पत्नी भक्तीत लीन, काय आहे प्रकार?

| Updated on: Sep 22, 2024 | 2:15 PM

Nashik Crime News : नवनाथ घायवट यांनी ११ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्यांचा गळफास घेतलेला व्हिडिओ आता समोर आला. हा प्रकार जादूटोणा नाही, असा दावा नाशिकरोड पोलिसांनी केला आहे. नवनाथ याची पत्नी मनोरुग्ण आहे.

Crime News : पतीने गळफास घेऊन जीवन संपवले, पत्नी भक्तीत लीन, काय आहे प्रकार?
Follow us on

Nashik Crime News : नाशिक शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कौटुंबिक वादातून पतीने आत्महत्या केली. त्यानंतर पत्नी भक्तीत लीन झाली. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी हा जादूटोण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरु झाली. परंतु हा जादूटोणा नाही तर मात्र पत्नी ही मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नवनाथ घायवट असे नाव आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

नाशिक रोडमधील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेतील पतीच्या लटकत्या मृतदेहासमोर मांडलेल्या पूजा साहित्याजवळ एक महिला त्या व्हिडिओत दिसत आहे. तसेच मृतदेहाच्या अंगावरही ठिकठिकाणी हळद व कुंकवासारखे पूजेचे साहित्य लावलेले दिसत आहे. सुरुवातीला हा हा प्रकार जादूटोण्याचा आणि अंधश्रद्धेतून झाल्याची परिसरात चर्चा होती. परंतु पत्नी मनोरुग्ण असल्याचा नातेवाईक आणि पोलिसांनी दावा केला आहे. नवनाथ घाटवट यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेला आठवडा उलटला आहे. त्यानंतर त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

का केली आत्महत्या

नाशिकमधील त्या दाम्पत्याने घरी दुर्गाष्टमीची पूजा केली होती. त्या पूजेच्या दिवशीच दोघांमध्ये झाला होता. हा वाद विकोपाला गेला. त्यातून नवनाथ घायवट यांनी आत्महत्या केली. कौटुंबिक जाचातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी केला दावा

नवनाथ घायवट यांनी ११ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्यांचा गळफास घेतलेला व्हिडिओ आता समोर आला. हा प्रकार जादूटोणा नाही, असा दावा नाशिकरोड पोलिसांनी केला आहे. नवनाथ याची पत्नी मनोरुग्ण आहे. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याची वैद्यकीय कागदपत्रे आम्ही तपासली आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान घायवट यांचे किराणा दुकान आहे. त्यांचे मुले शिक्षणासाठी पुण्यात आहेत.