नाशिक : नाशिकच्या घोटीजवळ ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे कट्टे ( पिस्टल ) जिवंत काडतुसांसह हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला आहे.
संबंधित संशयित आरोपींवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी इगतपुरी तालुक्यातील आडवण आणि वाडीवऱ्हे येथील आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.
अधिक माहिती अशी की, नाशिक ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक एन. पी. गुरुळे, ठाकरे, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस कॉन्स्टेबल पिंगळ यांचे पथक घोटी येथील वैतरणा फाटा परिसरात अवैध अग्निशस्त्राबाबत माहिती घेत होते.
यावेळी मिळालेल्या मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे खंबाळेवाडी जवळील तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंबाळेवाडी शिवारात १) संदीप शिवाजी कोकणे वय ३० वर्षे रा. आडवण ता. इगतपुरी जि. नाशिक, २) अनिल एकनाथ येलमामे वय ३१ वर्षे रा. वंजारी गल्ली वाडीवऱ्हे ता. इगतपुरी जि. नाशिक यांनी पळुन गेलेला इसम नामे गोकुळ गणेशकर यांचेकडून सुमारे दीड ते दोन महिन्यापूर्वी विना परवाना बेकायदा अवैध २ देशी बनावटीचे कट्टे ( पिस्टल ), 2 जिवंत काडतुसे असे विकत घेतले होते.
त्यांच्या अंगझडतीत २ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण किंमत रुपये 41 हजार चे मिळुन आले आहेत. संशयित आरोपी संदीप शिवाजी कोकणे, अनिल एकनाथ येलमामे यांना ताब्यात घेण्यात आले. घोटी पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.
मालेगाव ड्रग तस्करीचा अड्डा
मालेगावमध्ये ड्रग माफियाने हातपाय पसरल्याचे उघड झाल्याने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरात कुत्ता गोळीसह मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होते. हे जाळे नेमके कुठपर्यंत आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
मुंबईच्या नार्को टेस्ट विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली. गुजरातमधल्या मीरादातार येथे झोपडपट्ट्यांमधली अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी त्यांनी छापे मारले. त्यात रुबीना हे नाव पुढे आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा ती ड्रग माफिया असल्याचे उघड झाले. तिचे पूर्ण नाव रुबीना नियाज शेख आहे. पोलिसांनी रुबीनाला बेड्या ठोकल्यात. मात्र, या टोळीचा म्होरक्या निलोफर सांडोले पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे. याप्रकरणी रुबीनाचा कसून चौकशी केली असता, तिच्या टोळीने मालेगावमध्ये हातपाय पसरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता अमली पदार्थांच्या टोळीची चेन उद्धवस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
हे ही वाचा :
मालेगाव ड्रग तस्करीचा अड्डा; माफियाची शहरात कोट्यवधींचा मालमत्ता, कुत्ता गोळीचा पुरवठा