नाशिकः आपली मंत्रालयात ओळखय. तुम्हाला अगदी स्वस्तात प्लॅट मिळवून देतो. पंतप्रधान आवास योजनेत तुमचा नंबर लावतो, अशा नाना थापा मारून एका थापाड्याने नाशिकमधील नणंद – भावजयीला तब्बल 43 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी युवराज भोसले विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार झाली आहे. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वीही अनेकांना असाच गंडा घातल्याचे पोलीस म्हणतायत.
असा घातला गंडा
नाशिकमधील गांधीनगर भागात कुमावत कुटुंब राहते. यातील एक महिला सरकारी नोकरी करतात. त्या मैत्रीण जयश्री भालेरावसोबत पैठणी साडी शुटींगसाठी गेलेल्या. यावेळी त्यांची युवराज बाळासाहेब भोसलेसोबत ओळख झाली. त्याने काही दिवसांनंतर कुमावत यांना पैठणी साडीच्या शुटींगसाठी निवड झाल्याचे फोन करून सांगितले. मात्र, कुमावत यांनी बिझी असल्याचे सांगत नकार कळवला आणि आपल्या भावजयीचा नंबर दिला. युवराजने भावजयीला नाना थापा मारल्या. आपली मंत्रालयात ओळख आहे. अवघ्या 18 लाख रुपयांत नाशिकमधील गंगापूर एरियात तुम्हाला प्लॅट घेऊन देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी कुमावतला 18 लाखांची रक्कम दिली.
2020 ते 2021 मध्ये फसवणूक
युवराज भोसलेने 2020 ते 2021 मध्ये या नणंद – भावजयींना विविध आमिष दाखवत वेगवेगळ्या नावांनी 42 लाख 63 हजारांचा गंडा घातला. कधी तो ट्रेडिंगसाठी पैसे मागायचा, तर कधी आयफोन नावावर करून देण्यासाठी. इतकेच काय आपल्याकडे सोन्याचे बिस्कीट असून, तुमचे काही दागिने द्या. त्यात भर घालून देतो, अशी थापही त्याने मारली. त्या सोन्यावरही युवराज भोसलेने डल्ला मारला. अखेर ही फसवणूक थांबत नसल्याचे पाहून कुमावत नणंद-भावजयींनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
उच्चशिक्षित फसले कसे?
कुमावत नणंद-भावजयींना लाखोंचा गंडा घातला गेला. मात्र, या उच्चशिक्षित महिला फसल्या कसा, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी गंगापूर रोडच्या प्लॅटसाठी 43 लाख युवराज भोसलेला दिले. या किमतीत या भागात सहज प्लॅट मिळाला असता. इतकेच की अंतर थोडे जवळ, लांब राहिले असते. सध्याही गंगापूर रोड भागात अवघ्या 18 लाखांपासून विविध बिल्डरचे प्लॅट विक्रीला आहेत. त्याच्या पान-पान जाहिरातीही रोज अनेक दैनिकात प्रसिद्ध होतात. इतके असून, या महिला फसल्या कशा, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली