नाशिक : नाशकात प्री-वेडिंग शूटसाठी गेलेल्या फोटोग्राफरच्या गाडीची काच फोडून लाखोचं सामान चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
इगतपुरी तालुक्यातील भावली येथील धबधब्याजवळ एक फोटोग्राफर प्री-वेडिंग शूटसाठी आला होता. हा फोटोग्राफर मुंबई येथून आला होता. फोटोग्राफरने रस्त्याच्या कडेला त्याची शेवरलेट कंपनीची चारचाकी उभी केली होती. त्यानंतर तो धबधब्याजवळ प्री-वेडिंग शूटसाठी गेला. जेव्हा तो शूटवरुन परतला तेव्हा त्याला त्याच्या गाडीच्या काचा फुटलेल्या दिसल्या आणि आपल्या गाडीतील सामान चोरी झाल्याचं त्याला कळालं.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारची दुपारी 4 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी काचा फोडून अडीच लाख रुपये किंमत असलेले कॅमेऱ्याच्या 3 लेन्स, बॅटरी, चार्जर इत्यादी साहित्य असलेली बॅग चोरुन नेली. शूटिंग आटपून आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास इगतपुरी पोलीस करत आहेत.
90 नथींवर महिला चोरट्यांचा डल्ला
भिवंडीत दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यास पायबंद घालण्यात भिवंडी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मागील काही दिवसांपूर्वी ज्वेलर्स दुकानात आलेल्या बुरखाधारी महिलांनी 32 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्यांवर डल्ला मारल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बाजारपेठेत आलेल्या दोघा बुरखाधारी महिलांनी एका ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल 90 नथींवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.
बाजारपेठ पारनाका या ठिकाणी असलेल्या मानसी ज्वेलर्स दुकानात 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दोन बुरखाधारी महिला नाकातील नथ व कानातील कर्णफुले घेण्याच्या बहाण्याने आल्या असता आपापसात संगनमत करून दुकानाच्या काऊंटरवरील लाल रंगाच्या फोल्डर मध्ये लावून ठेवलेल्या 2 लाख 71 हजार रुपये किमतीच्या 90 नथींवर दुकानदाराचे लक्ष विचलित करून महिलांनी डल्ला मारला.
संबंधित बातम्या :
दागिने घ्यायच्या म्हणून आल्या, सोन्याच्या 90 नथी घेऊन पळाल्या, चोरीचा CCTV व्हिडीओ पाहाच
वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चोरी, खून, दरोडे; सांगलीतील पाटील टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई