मालेगाव : मालेगावात (Malegaon) एक धक्कादायक घडना घडलीयं. पुराच्या पाण्यात उडी मारून स्टंटबाजी करणारा तरूण वाहून गेलायं. गिरणा नदीला पूर आल्याने पाण्याची पातळी वाढली होती. मात्र, याचदरम्यान एक तरूण स्टंटबाजी करण्यासाठी नदीच्या (River) पुलावर चढला आणि चक्क पुराच्या पाण्यात वाहून गेला. तरूणाचा हा स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नाशिक जिल्हात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस (Rain) सुरू असल्याने जिल्हातील अनेक नद्यांना पूर आलायं.
गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना तरूण वाहून गेल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना यापूर्वींही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, असे असतांना देखील तरूण नदीला पूर आल्यानंतर स्टंटबाजी करण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीयंत. गिरणा नदीला पूर आला असताना तरूणाने नदीत उडी घेतली आणि वाहून गेला.
गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात पुलावरून स्टंटबाजी करताना वाहून गेलेल्या तरूणाचे नाव नईम अमीन आहे. तो मालेगावचाच रहिवाशी असल्याचे कळते आहे. या तरूणाचा शोध घेतला जात आहे, मात्र तो अजून सापडला नाही. रात्री अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळी परत एकदा तरूणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.