इगतपुरीः नाशिकचा तरुण इगपुरीमधून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील मित्राला भेटायला गेलेला निखिल अचानक गायब झाला असून, त्याल्या शोधून थकलेल्या आई-वडिलांनी अखेर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, निखिल नाना केदारे (वय 23) हा तरुण नाशिकमधल्या इंदिरानगर भागातील रथचक्र सोसायटीत आपल्या आई-वडिलांसह रहायचा. मात्र, निखिल 21 ऑक्टोबर रोजी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील सिंधू नरवाडे या मित्राला भेटायला गेला. त्याची व त्या मित्राची भेट झाली. त्यानंतर तो कोणाला काहीही न सांगता निघून गेला. मात्र, अचानक तो कुठे गेला की, त्याचे कोणी अपहरण केले, याची चिंता आई-वडिलांना आहे. निखिलची आई मंगला नाना केदारे (वय 50) यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. निखिलची शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याची उंची 5 फूट 5 इंच असून रंगाने गोरा, चेहरा गोल, नाक सरळ आहे. तो बेपत्ता झाला त्या दिवशी त्याने अंगात काळा शर्ट व पांढरी पँट, पांढरा बूट घातला होता. त्याच्या कानात काळ्या रंगाची बाळी आहे. या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन वाडीवऱ्हेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास फड यांनी केले आहे. पोलिसांनीही त्याचा तपास सुरू केला आहे.
फटाके फोडणारा मुलगा गंभीर जखमी
फटाके फोडणे एका सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले असून, त्याच्यावर आता नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकच्या इंदिरानगर मधील पांडवनगरीत राहणाऱ्या शौर्य लाखोडे हा सात वर्षांचा मुलगा मित्रांसोबत फटाके फोडत होता. त्यांची रोजप्रमाणेच धमाल मस्ती सुरू होती. ते फटाके पेटवायचे आणि बाजूला फेकायचे. मोठा आवाज व्हायचा. त्यानंतर ही मित्रमंडळी टाळ्या वाजवायची. असा खेळ बराच वेळ रंगला. मात्र, अचानक एका मित्राने फटाका पेटवून बाजूला फेकला. तो नेमका शौर्यच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. सोबत फटाकाही वाजला. यामुळे शौर्य मोठ्या प्रमाणात भाजला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही परिस्थिती पाहता शौर्यच्या आईने फटाका विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.
इतर बातम्याः
ठरलं! साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच, नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये सोहळा!!
‘मविआ’च्या शिल्पाची काळजी घ्यावी, मी सेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा षटकार, नांदगावबद्दल पवारांशी बोलणारhttps://t.co/cX43PuxoYM#MahavikasAghadi|#SanjayRaut|#ChhaganBhujbal|#ShivSena|#NCP|#Nandgaonconstituency
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021