गडचिरोली- नक्षलविरोधी कारवाईत गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या 26 नक्षलवाद्यांच्या नावांची यादी समोर आली आहे. कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या जवानांनी शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांची यादी पुढील प्रमाणे
मौजा मनटोला जंगल परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान मरण पावलेल्या नक्षलवाद्यांचे नावे व पद.
1 अडमा पोडयाम – गंगलुर एरीया (छ.ग.) –
2 बंडू ऊर्फ दलसू राजु गोटा – रा. गोरगुट्टा, ता. एटापल्ली, जि. गड. – इनाम 4 लाख रुपये
3 प्रमोद ऊर्फ दलपत लालसाय कचसामी – रा. वडगाव, ता. कोरची, जि. गड. – इनाम 4 लाख रुपये
4 कोसा ऊर्फ मुसाखी – बस्तर एरीया, (छ.ग.) – इनाम 4 लाख रुपये
5 निरो – दक्षिण माड एरीया, (छ.ग.)
6 चेतन पदा – दक्षिण बस्तर (छ.ग.) – इनाम 2 लाख रुपये
7 विमला ऊर्फ ईमला ऊर्फ कमला ऊर्फ मान्सो सुखराम बोगा – रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली – इनाम 4 लाख रुपये
8 किशन ऊर्फ जैमन – रा दरभा एरिया (छ.ग) – इनाम 8 लाख रुपये
9 जिवा ऊर्फ दिपक ऊर्फ मिलींद तेलतुंबके – रा राजुर ता.वणी जि. यवतमाळ, इनाम 50,लाख रुपये
10 महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा, रा. रेगडीगुट्टा, गडचिरोली, डिव्हीसीएम कसनसुर दलम, एके -47, इनाम 16 लाख रुपये
11 भगतसिंग ऊर्फ प्रदिप ऊर्फ तिलक मानकुर जाडे. रा. खसोडा, गडचिरोली, एसीएम बॉडीगार्ड (मिलींद तेलतुंबडे), इनाम 6 लाख रुपये
12 सन्नू ऊर्फ कोवाची, रा. बस्तर एरीया, छत्तीसगड, कमांडर कसनसुर दलम, एके- 47, इनाम 8 लाख रुपये
13 प्रकाश ऊर्फ साधू सोनू बोगा, रा. संबलपूर, गडचिरोली, पिएम, कंपनी नं 4, एसएलआर, इनाम 4 लाख रुपये
14 लच्छु, रा. बस्तर एरिया, छत्तीसगड, पिएम कंपनी नं.4 बॉडीगार्ड प्रभाकर, 12 बोर, इनाम 4 लाख रुपये
15 नवलुराम ऊर्फ दिलीप हिरुराम तुलावी, रा. गजमेंढी, गडचिरोली, पिपिसीएम कंपनी नं 4, एसएलआर व 9 एमएम पिस्टल, इनाम 4 लाख रुपये
16 लोकेश ऊर्फ मंगू पोड्याम, मडकाम, रा. जागरगुंडा, दंतेवाडा,छत्तीसगड, डिव्हीसीएम व कमांडर कंपनी नं 4, एके -47,9 एमएम पिस्टल व युबीजिएल सेल, इनाम 20 लाख रुपये
या कारवाईत ठार झालेल्या 26 नक्षलवाद्यांमध्ये चार अनोळखी महिला नक्षल व सहा अनोळखी पुरुष नक्षवाद्यांचा समावेश आहे. कारवाई दरम्यान पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे. आणखी नक्षलींच्या ओळखी पटवण्याचं काम सुरु आहे.
हे ही वाचा
Breaking : मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन, मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी