पुणे – चाकणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चाकण एसटी बसस्थानकांच्या जवळ नुकतेच जन्मलेलं स्त्री जातीचं नवजात अर्भक आढळल्याची घटना घडली आहे. बस स्थानक परिसरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुजित अजित काळे वय 24, खेड या रिक्षा चालकाला हे अर्भक आढळून आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी सातच्या सुमारास सुजित व त्याचा मित्र विनोद भगवान हजारे असे चाकण बसस्टँन्ड जवळील रोडवर रिक्षा लावून उभे होते. त्यावेळी स्टँड शेजारी असलेलया एका इलेक्ट्रीक दुकानाशेजारी लहान बाळाच्या रडण्याच्या आवाज येत असल्यानं नागरिकांनी तिथं गर्दी केली होती. हे दोघेही तिथे गेले असता, त्यांना तेथील एका झाडाजवळ गोणपाटात स्त्री जातीचे नवजात अर्भक टाकून देण्यात आल्याचे दिसून आले. मात्र त्या नवजाताच्या बाजूला कोणीही दिसून आले नाही.त्यानंतर रिक्षाचालकांनी तत्परता दाखवत अर्भकाला ताब्यात घेत चाकण पोलीस स्थानकात आणण्यात आले. या स्त्रीला अर्भकाला नेमके कुणी या परिसरात सोडले.
अनैतिक संबंध लपवण्यासाठी
सदरचे नवजात स्त्री अर्भक अनैतिक संबंधातून नुकतेच जन्मलेले असावे. हे संबंध लपवण्यासाठी संबंधित महिलेने हे अर्भक बस स्थानक परिसरात सोडून दिले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अज्ञात महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या अर्भकास असे बेवारसपणे सोडणाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे.
VIDEO: शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शिंदे समर्थक भडकले, थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक