पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू; किसान आंदोलनामुळे आला होता चर्चेत

| Updated on: Feb 15, 2022 | 11:13 PM

पंजाबी कलाकार दीप सिद्धू याचा मंगळवारी झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला. दीप सिद्धू म्हणजे ज्यावेळी किसान आंदोलन सुरू होते, त्या आंदोलनाला त्याने जाहीर पाठींबा देत तो सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह झाला होता.

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू; किसान आंदोलनामुळे आला होता चर्चेत
Follow us on

मुंबईः पंजाबी कलाकार दीप सिद्धू (Deep Sidhhu) याचा मंगळवारी झालेल्या कार अपघातात (Car Accident) मृत्यू (Death) झाला. दीप सिद्धू म्हणजे ज्यावेळी किसान आंदोलन सुरू होते, त्या आंदोलनाला त्याने जाहीर पाठींबा देत तो सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह होता. या अपघातावेळी त्याच्या कारमध्ये एका महिलाही असल्याचे समजले आहे. तो आपल्या कारमधून मित्रांसोबत दिल्लीवरून पंजाबला जात होता. यावेळी कुंडली बॉर्डरजवळ त्याच्या कारचा आणि ट्रकची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृ्त्यू झाला  असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला त्यान जाहीर पाठिंबा दिला होता. याप्रकरणात त्याच्या गुन्हाही दाखल करु त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आले होते. त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता.

या अपघातानंतर दीप सिद्धू याचा मृतदेह खरसौदा रुग्मलयामध्ये ठेवण्यात आला होता. या अपघाताची माहिती मिळताच दीप सिद्धूचे अनेक चाहत्यांनी त्याच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले. दीप सिद्धू हा कलाकार किसान आंदोलनावेळी चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणातही तो आरोपी होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.

शेतकऱ्यांना उसकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

देशात ज्यावेळी कृषि कायद्यासाठी दीर्घकाळ आंदोलन करण्यात आले, त्यावेळी आंदोलनातील शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावेळी लाल किल्ल्यावर काही लोकांनी झेंडा लावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याच्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उसकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या या घटनेत पाचशे पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर हे आंदोलन उसकवण्यासाठी तो आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
लाल किल्ल्याच्या घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, आता फक्त आम्ही लाल किल्ल्यावर साहिबवाला ध्वज फडकावला आहे, आणि तो आमचा सांविधानिक अधिकार असल्याचेही त्याने सांगितले होते.

दीप सिद्धूने सनी देओलचा केला होता प्रचार

अभिनेता आणि गुरुदासपूर लोकसभेच्या मतदारसंघातून खासदार झालेला सनी देओलने या आंदोलनानंतर दीप सिद्धूचा आणि आपला काही संबंध नाही असे जाहीर केले होते, मात्र 2019 च्या निवडणूकीत दीप सिद्धू हा त्याच्या निवडणूकीतील महत्वाचा भाग होता. त्यावेळी दीप सिद्धूने सनी देओलचा जोरदार प्रचार केला होता.

संबंधित बातम्या

डी सुनो, मै नंगा आदमी हुँ, जितेंद्र नवलानी कौन है, राऊतांनी ईडीच्या वसुली एजंटांची मांडली कुंडली!

ठाकरे सरकार पाडण्यासाठी नेमकं कोण भेटलं? कोण ‘टाईट’ करतंय? पहिल्यांदाच राऊतांनी फोडून सांगितलं?

हिजाब-बुरखा घातलेल्या महिलेचे चाकूनं सपासप वार, टॅक्सी चालकावर का केला हल्ला?