प्रशांत चलिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी: परभणीकरांसाठी आजची पहाट दु:खदायक ठरलीय. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील केकरजवळा गावात मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार नागरिकांना भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं चिरलडल्याची घटनी घडलीय. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय. दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मानवत तालुक्यातील केकरजवळा गावातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर परभणीत उपचार सुरू आहेत.
पहाटेच्या सुमारास पोलीस पाटील उत्तमराव लाडाणे, आत्माराम लाडाणे, नंदकिशोर लाडाणे, राधाकिशन लाडाणे पाथरी पोखर्णी रोडवर मॉर्निंग वॉक करत असताना पोखर्णीहून पाथरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या चारही जणाना धडक दिली. यात उत्तमराव लाडाणे व आत्माराम लाडाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदकिशोर लाडाणे व राधाकिशन लाडाणे यांच्यावर परभणी येथे उपचार चालू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्त्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात दुचाकी खड्ड्यात पडल्याने दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे. सेनगाव /एलदरी मार्गावरील ही घटना घडली आहे. रखडलेल्या पुलाच्या कामामुळे अपघात झाल्याचं समोर आलं आहे. याच पुलाच्या खड्ड्यात काही महिन्यांपूर्वी चार चाकी पडून चौघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असताना दुसरा अपघात झाला तरी प्रशासन मात्र सुस्त असल्याचं समोर आलं आहे.
हिंगोलीतील त्या खड्ड्यात चौघांनी गमावला जीव
पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पडून जून महिन्यात हिंगोलीत चौघा शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेला जबाबदार असलेल्या कल्याण टोलच्या ठेकेदाराविरोधात मृतांच्या नातेवाईकांनी तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपी ठेकेदाराविरोधात कलम 304 अन्वये सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हिंगोलीतील राज्य महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातामध्ये चौघा जणांना प्राण गमवावे लागले होते. सेनगावनजीक रविवारी रात्री हा प्रकार घडला. सध्या हिंगोलीत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. सेनगाव जिंतूर रस्त्यावरही काम सुरु असून त्यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली.
पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे भरधाव कार वेगाने जाऊन खड्ड्यात पडली. कार खड्ड्यात पडल्यानंतर लगेच लॉक झाली. पाण्यात बुडलेल्या गाडीतून बाहेर पडता न आल्यामुळे चारही जणांचा गाडीतच गुदमरुन करुण अंत झाला.
इतर बातम्या:
कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली, गाडी लॉक झाली, पाण्यात बुडून चौघांचा अंत
Video: काढायला गेले कार, सापडला मासा, मुंबईकरांच्या सुट्टीला असाही तडका
मुंबई किती धोकादायक? काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ
हेही पाहा
Parbhani Unknown Truck accident two person died and two serious injure in Manvat Taluka who going to morning walk