किशोर पाटील, जळगाव | जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनी दारु पिऊन जळगावात धिंगाणा केला होता. पोलिसामधील हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जळगाव पोलीस दलातील कर्मचाऱ्याने वर्दीत बारमध्ये मद्यपान केले. त्यानंतर बारबाहेर येऊन हाणामारी केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चौकशी केली. त्यात दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर असे त्याचे नाव आहे. परंतु या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नाही. कारण यासंदर्भात कोणाची तक्रार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जळगावात गणवेशातच हॉटेलात मद्यपान करून दारूच्या नशेत हाणामारी करण्याचा प्रकार घडला होता. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर हा या प्रकारात दोषी आढळून आला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी संदीप धनगर याच्या निलंबनाचे आदेश काढले.
गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाले होते. दोन पोलिसांमधील हाणामारीचा हा व्हिडिओ समोर आला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर याला निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. या प्रकरणात संबंधिताची चौकशी करण्यात येणार आहे. निलंबन काळात संदीप धनगर याला मुख्यालयात रहावे लागणार आहे.
रविवारी 25 ऑगस्ट रोजी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाली होती. हे पोलिस कर्मचारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील असल्याचे समोर आले. त्याविषयी अहवाल पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाला. गणवेशात मद्यपान केल्याचा ठपका ठेवून धनगर याला निलंबित करण्यात आले. आता या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येणार आहे.
फिर्यादी नाही…म्हणून गुन्हा नाही
दरम्यान, या प्रकरणी कोणाची तक्रार दिली नाही. यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. कोणाची फिर्याद आली तर योग्य ते कलम लावून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
हे ही वाचा…
बारमध्ये वर्दीवर दोन पोलीस तर्रर्र…मग दोघं पोलिसांमध्येच…व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल