एका फ्लॅटमध्ये 30 तुकड्यांमध्ये आढळलेल्या महिलेचा मृतदेह प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हा मृतदेह 29 वर्षीय महालक्ष्मीचा असल्याचं समोर आलंय. जिचा निर्घृणपणे हत्या करण्यात आला. महालक्ष्मी गेल्या 9 महिन्यांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तिचे उत्तराखंडमधील रहिवासी अश्रफ नावाच्या तरुणाशी संबंध होते. महालक्ष्मी यांचे पती हेमंत दास यांनी सांगितले की, त्यांनी तिला एक महिन्यापूर्वी पाहिले होते, जेव्हा ती मुलीला भेटण्यासाठी त्यांच्या दुकानात आली होती. हेमंत दास यांनी सांगितले की, महालक्ष्मी काही महिन्यांपासून अश्रफसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याच्यासोबतच फ्लॅटमध्ये राहत होती.
फ्लॅटमध्येच 30 तुकड्यांमध्ये महालक्ष्मीचा मृतदेह आढळून आलाय. लोकांना दुर्गंधी येत असल्याने दरवाजा तोडण्यात आला. ज्यानंतर तिचा खून झाल्याचं समोर आलं. आत गेल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. महालक्ष्मीचा मृतदेह तुकड्यांच्या अवस्थेत आढळून आला. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली. हेमंत दास यांनी सांगितले की, अश्रफ आणि महालक्ष्मी यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यामुळे त्याला बंगळुरूला जाता आले नाही. आता या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
हेमंत दास यांनी सांगितले की, महालक्ष्मीसोबत लग्न झाल्यानंतर ते फक्त 6 महिनेच एकत्र राहिलेय. काही महिन्यांपूर्वी अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यात वाद झाल्याने ते दोघे वेगळे झाले होते. हेमंत दास यांनी दावा केला की, अश्रफसोबत महालक्ष्मीचे अनैतिक संबंध होते. अशरफ हा सलूनमध्ये काम करायचा. हा खून अश्रफनेच केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याप्रकरणी पोलीस अधिकारी म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. मुख्य आरोपीच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी ओळख उघड करण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही त्याच्याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही कारण त्यामुळे आरोपीला मदत होऊ शकते. गृहमंत्री यांनी या प्रकरणी पोलिसांनी बरीच माहिती गोळा केल्याचे म्हटले आहे.