पाटणा : युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, असं म्हणतात. पण कुणासोबतही मन जुळवण्याआधी समोरची व्यक्ती त्या पात्रतेची आहे का? ती आपला विश्वासघात तर करणार नाही ना? याची शाहनिशा जरुर करावी. देशासह जगभरात अशा प्रेरीत ठरणाऱ्या अनेक प्रेम कहाण्या आपण ऐकल्या किंवा वाचल्या आहेत. पण अशा प्रेम कहाण्यांमधून प्रेरित होऊन कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून प्रेम करु नये. कारण बिहारच्या गया येथे एका तरुणीला याच गोष्टीचा प्रत्येय आला आहे. या तरुणीचं एका लग्नात तरुणासोबत मन जुळलं होतं. ते सगल दोन वर्ष नात्यात होते. पण प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत याप्रकरणावर तोडगा काढला
बिहारच्या गया येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. नितीश कुमार नावाच्या एका प्रियकराने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध स्थापन केले. त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. याच दरम्यान प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. अखेर या प्रकरणी प्रेयसीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीऱ्याने दखल घेत प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावलं. त्यानंतर दोघांचं पोलीस ठाण्यातच लग्न लावून दिलं.
तक्रारदार तरुणीच्या आतेबहिणीच्या लग्नात तिची आरोपी नितीश कुमार याच्यासोबत ओळख झाली होती. तेव्हा त्यांची आधी मैत्री झाली होती. त्यानंतर हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. नितीशने तरुणीला लग्न करण्याचं वचन दिलं होतं. पण लग्नाआधीच त्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून तरुणी गर्भवती झाली.
तरुणीची एकेदिवशी अचानक प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासात ती गर्भवती असल्याची माहिती उघड झाली. संबंधित माहिती समोर आल्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांना धक्काच बसला. यावेळी तरुणीने आपल्या प्रेम प्रकरणाची कबुली दिली. मुलीचे कुटुंबिय दोघांच्या लग्नासाठी देखील तयार होते. पण यावेळी तरुणीच्या प्रियकरानेच लग्नाला नकार दिला.
देशात रविवारी 75 वा स्वातंत्र्यदिवसाचा जल्लोष होता. गया येथील महिला पोलीस ठाण्यातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह होता. झेंडावंदननंतर सर्व पोलीस कर्मचारी आपापल्या जागेवर बसली होती. यावेळी एक तरुणी पोलीस ठाण्यात आली. तिने प्रेमात आपल्यासोबत विश्वासघात झाल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपीने लग्नाचं आमिष देवून शारिरीक संबंध बनवले. त्यातून गर्भवती राहिल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला, अशी व्यथा तरुणीने मांडली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदार तरुणी आणि तिच्या प्रियकराचं पोलीस ठाण्यातच लग्न लावून दिलं.
प्रेयसी आपल्याविरोधात पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती प्रियकर नितीश कुमारला लागली. त्याला विचारांनीच घाम फुटायला लागला. अखेर तो पोलीस ठाण्यात दाखल झाला. तिथे गेल्यावर पोलिसांनी त्याची समजूत काढत प्रेयसीसोबत लग्नाचा सल्ला दिला. तसेच पोलिसांनी पोलीस ठाण्यातच दोघांचं लग्न लावून दिलं.
हेही वाचा :
कॉलेज डीनच्या घरी 11 लाखांची चोरी, घरकाम करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या
शेजाऱ्याशी 50 रुपयांवरुन वाद, धडा शिकवण्यासाठी 22 वर्षीय तरुणाने बाळाला टँकमध्ये बुडवलं