पुणे – मागील आठवडा भरापासून सोशल मीडियावर , शहरात ठीक ठिकाणी बाणेर मधून अपहरण झालेल्या डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या बालकाची चर्चा होती. या स्वर्णम चव्हाणला शोधण्यात पोलिसाना अखेर यश आले आहे. अखेर तो आपल्या आई-वडिलांकडे परतला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे तो पोलिसांना आढळून आला आहे.
काय घडलं होत
मागील आठवड्यात आठवड्यात शहरातील बालेवाडी परिसरातून चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण याचे अपहरण झाले होते. त्यानंतर शहर पोलिसांकडून त्याचा कसून तपास करण्यास सुरुवात केली. तपासासाठी पोलिसांची पथकेही तैनात करण्यात आली होती.सोशल मीडियातूनही याबद्दल माहिती देण्यात आली होती. नेटकऱ्यांनी तो परत मिळावा यासाठी प्रार्थना व सदिच्छा व्यक्त केल्या होत्या अखेर आज तो सापडला. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता.
महापौरांनी मानले पोलिसांचे आभार
बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पालकांच्या कुशीत असलेला स्वर्णवला पाहण्यासारखं दुसरं सुख ते काय?
यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! या या शब्दात महापौर मुरलीधर मोहळ यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत.
स्वर्णव सुखरुप सापडला; अभिनंदन @PuneCityPolice !
बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पालकांच्या कुशीत असलेला स्वर्णवला पाहण्यासारखं दुसरं सुख ते काय?@CPPuneCity
यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! pic.twitter.com/MT9vV00fHt— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 19, 2022
पोलिसांनी पाळली कमालीची गुप्तता
स्वर्णम चव्हाण याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली. त्याच्या शोधासाठी पोलीस पथकांच्या माध्यमातून शोध सुरु होता. खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास तीनशेहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे. चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
Sania mirza Reitrement: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा
India in UNSC: पाकिस्तानात बॉम्ब स्फोटातील आरोपींना पंचतारांकित सुविधा
VIDEO: 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 AM | 19 January 2022