Pimpri Chinchwad : बिल्डिंग खाली खेळताना गायब झाला, आता टेरेसवर डेडबॉडी आढळल्यानं खळबळ! 7 वर्षांच्या आदित्यसोबत नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 10, 2022 | 9:34 AM

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आता आदित्यच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. आदित्यची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आदित्यचं अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची दाट शंका घेतली जातेय.

Pimpri Chinchwad : बिल्डिंग खाली खेळताना गायब झाला, आता टेरेसवर डेडबॉडी आढळल्यानं खळबळ! 7 वर्षांच्या आदित्यसोबत नेमकं काय घडलं?
मृत आदित्य आणि दोघे संशयित आरोपी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पिंपरी चिंचवड : दोन दिवसांपूर्वी अपहरण (Pimpri Chinchwad Crime News) झालेल्या मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळ घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. आदित्य ओगले (Aditya Ogale) असं हत्या (Pimpri Chinchwad Murder) करण्यात आलेल्या सात वर्षांच्या मुलाचं नाव आहे. गुरुवारी आदित्यचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरु होता. आता अचानक आदित्यचा मृतदेह आढळून आल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी इमारतीच्या खाली खेळत असताना आदित्य बेपत्ता झाला होता. आता दुसऱ्या एका इमारतीच्या टॅरेसवर आदित्यचा मृतदेह आढळून आला आहे. सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाहून आदित्यच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

29 तासांनी मृतदेह सापडला

‘मी खेळायला जातो’, असं सांगून आदित्य गुरुवारी घराबाहेर पडला होता. संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास आदित्य बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. मुलगा कुठे आढळून न आल्यानं अखेर आदित्यच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानक गाठलं. आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी आदित्यचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री आदित्यचा मृतदेह आढळून आला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. भोसरीतील एमआयडीसीमध्ये एका इमारतीच्या टेरेसवर सात वर्षीय आदित्यचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडालीय.

हे सुद्धा वाचा

दोघांची चौकशी

पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आता आदित्यच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. आदित्यची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आदित्यचं अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची दाट शंका घेतली जातेय. सध्या पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना ताब्यातही घेतलंय. त्यांची कसून चौकशी केली जाते आहे.

पाहा लाईव्ह घडामोडी : LIVE

वडिलांना खंडणीसाठी फोन

मृत आदित्यचे वडील हे पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक आहे. गजानन ओगले असं त्यांचं नाव आहे. ते पिंपरीच्या मासुळकर कॉलनीत राहतात. आदित्य गायब झाल्यानंतर कुटुंबीयांना 20 कोटी रुपये खंडणीची मागणी करणारा एक फोन आला होता, अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेला संशयीत आरोपी आणि आदित्य हे एकाच इमारतीमधील राहणारे असल्यानं आता वेगळीच शंका घेतली जातेय.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गूढही अधिक वाढलंय. आदित्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्याची हत्या झाली असेल तर ती कोणत्या कारणामुळे केली गेली? कशी केली गेली? नेमका आदित्यच्या मृत्यूमागे कुणाचा हात? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय. दरम्यान, इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज, सुरक्षा रक्षक, आदित्यचे कुटुंबीय, त्याचे फोन कॉल्स आणि ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीला पोलिसांनी सुरुवात केलीय. त्यातून नेमका काय खुलासा होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.