दौंड : अज्ञात कारणावरुन दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्यक्तीची धारदार हत्याराने वार (Attack) करुन हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय बनकर असे हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी (Accuse) घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. गजबजलेल्या ठिकाणी ही हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, हे यातून स्पष्ट होते.
पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात पालखी स्थळाजवळ धारधार हत्याराने संजय बनकर यांची हत्या करण्यात आली. छातीत आणि पोटात वार करून ही हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यवत पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने ही हत्या का केली ? हे अद्याप कळू शकले नाही. आरोपीला अटक केल्यानंतरच याबाबत खुलासा होईल. दरम्यान, मयत बनकरबाबत पोलीस माहिती घेत आहेत. मात्र गजबजलेल्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्या वादातून एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या केल्याची घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. अक्षय वल्लाळ असे मयत तरुणाचे नाव आहे. आरोपी आणि मयत तरुण एकाच परिसरात राहतात. मयत अक्षय मित्रांसोबत बोलत असताना हल्लेखोरांनी पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. अटक केलेले आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गु्न्हेगार आहेत. (A person was killed by stabbing a person with a sharp weapon for unknown reason in Daund)